esakal | बाजारात देवीमूर्ती दाखल! कोरोनामुळे विक्रीमध्ये घट; राजस्थानच्या मूर्तिकारांची पाठ  
sakal

बोलून बातमी शोधा

navratri murti 123.jpg

नवरात्रीनिमित्त नगर, पेण येथील देवीच्या मूर्ती द्वारका भागातील बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. राजस्थानच्या मूर्तिकारांनी कोरोना प्रादुर्भावामुळे शहराकडे पाठ फिरवली आहे. दर वर्षी महिनाभरापूर्वी ते द्वारका भागात दाखल होऊन मूर्ती साकारतात. त्याचा काही प्रमाणात फायदा होणार असल्याची माहिती स्थनिक विक्रेत्यांनी दिली.

बाजारात देवीमूर्ती दाखल! कोरोनामुळे विक्रीमध्ये घट; राजस्थानच्या मूर्तिकारांची पाठ  

sakal_logo
By
युनूस शेख

नाशिक : नवरात्रीनिमित्त नगर, पेण येथील देवीच्या मूर्ती द्वारका भागातील बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. राजस्थानच्या मूर्तिकारांनी कोरोना प्रादुर्भावामुळे शहराकडे पाठ फिरवली आहे. दर वर्षी महिनाभरापूर्वी ते द्वारका भागात दाखल होऊन मूर्ती साकारतात. त्याचा काही प्रमाणात फायदा होणार असल्याची माहिती स्थनिक विक्रेत्यांनी दिली. 

अद्याप एकाही मूर्तीची बुकिंग नाही
द्वारका भागात राजस्थानच्या मूर्तिकारांसह शहरातील विविध भागांतील मूर्तिकार येतात. बाजारात नगर आणि पेण येथून विविध प्रकारच्या देवीमूर्ती दाखल झाल्या आहेत. एक फुटापासून ते साडेसात फुटांच्या मूर्ती विक्रीस आल्या आहेत. एक हजार १०० ते २१ हजारांपर्यंत मूर्तिंचे दर आहे. अंबामाता, रेणुकामाता, कालिका, सप्तशृंगीदेवी, माँ शेरावाली या मूर्तींचा यात समावेश आहे. असे असले तरी अद्याप एकाही मूर्तीची बुकिंग झालेली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव आहेच. शिवाय अधिकमासामुळे नवरात्रोत्सव एक महिना पुढे ढकलल्याने तो कसा साजरा करायचा, याबाबतचे नियोजन सार्वजनिक मंडळांकडून झालेले नाही. ५ ऑक्टोबरनंतर ग्राहक मूर्ती बुकिंगसाठी बाहेर पडण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली. ग्रामीण भागातील मंडळेही साधारण याच वेळी येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात कोरोनाबांधितांचा आकडा वाढल्याने त्यांचीही मागणी घटण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा >  मुख्यमंत्र्यांना दिली चक्क खोटी माहिती; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

स्थानिकांच्या आशा पल्लवित 
२५ ते ३० वर्षांपासून नवरात्रीनिमित्त राजस्थानचे मूर्तिकार द्वारका भागात दाखल होतात. त्यांच्या आकर्षक मूर्तींना मागणीही असते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी सरकारने अनेक अटी घालून दिल्या आहेत. शिवाय साध्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होणार असल्याने मूर्तींना मागणी होणार की नाही, मागणी झाली नाही, तर मोठे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी मूर्तिंकारानी शहरात न येण्यास पसंती दर्शविली आहे. त्यामुळे स्थानिक मूर्तिकारांच्या काही प्रमाणात आशा पल्लवित झाल्या आहेत. 

हेही वाचा > 'रेमडेसिव्हिर'च्या काळ्या बाजाराला जिल्हाधिकाऱ्यांकडून चाप; मेडिकलबाहेर फलक लावण्याचे निर्देश

कोरोनामुळे नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. दांडियास परवानगी नसणार, सार्वजनिक मंडळाकडून नवरात्री साजरे करण्याचे प्रमाण कमी असणार आहे. जुन्या ग्राहकांवरच यंदाची देवीमूर्ती विक्री अवलंबून असल्याने कमी मूर्ती विक्रीस मागविल्या आहेत. - मनोज चौधरी, विक्रेता  

संपादन - ज्योती देवरे 

loading image