Nashik Crime : वृद्धाच्या गळ्यातून सोनसाखळी लंपास

 theft gold chain
theft gold chainesakal

Nashik Crime : मुंबई नाका महामार्ग बसस्थानकावर गर्दीची संधी साधत अज्ञात संशयितांनी वृद्धाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली.

शनिवार (ता. २०) दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली. मुंबई नाका पोलिस ठाण्यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (gold chain stolen from old age person nashik crime)

गंगाधर बाबू जाधव (७५, रा. ध्रुवनगर सातपूर) शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्या पत्नीसह त्यांच्या सिन्नर येथील शाह पांचाळे गावात जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकावर गेले.

शिर्डी बसमध्ये चढत असताना अज्ञात संशयितांनी गर्दीची संधी साधत त्यांच्या गळ्यातील १६ ग्राम वजनाची सुमारे ५० हजारांची सोन्याचे पान असलेली सोनसाखळी लंपास केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 theft gold chain
Nashik Crime : पत्नीच्या चारित्र्यावरून मुलाला फेकले विहिरीत

बसमध्ये बसल्यानंतर गळ्यात सोनसाखळी नसल्याचे समजले. त्यांनी बसच्या खाली उतरून सोनसाखळी शोधण्याचा प्रयत्न केला.

बसस्थानकावर सोनसाखळी पडली असल्याची चौकशी केली, साखळी मिळून आली नाही. अज्ञात संशयितांनी चोरी केल्याची खात्री झाली. मुंबई नाका पोलिस ठाणे गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

 theft gold chain
Crime : "लग्नापूर्वीचे फोटो तुझ्या वडिलांना दाखवेन" अशी धमकी देत घरात घुसून महिलेवर बलात्कार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com