नाशिक : चांगल्या पावसामुळे चाराटंचाईवर फुली

सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यात चांगली परिस्थिती
नाशिक : चांगल्या पावसामुळे चाराटंचाईवर फुली

नाशिक : उन्हाळा लागला की पाण्याबरोबरचं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होतो. परंतु यंदा जनावरांचा चारा टंचाई भासणार नाही. त्याला कारण म्हणजे यंदा पाऊस चांगला झाल्याने अद्यापही मागणी नोंदविण्यात आलेली नाही. त्यामुळे चारा टंचाई नसणारे सलग तिसरे वर्ष ठरणार आहे. यापूर्वी सन २०१८-१९ मध्ये आठ तालुक्यांमध्ये चारा टंचाई निर्माण झाली होती.

सन २०१८ मध्ये पावसाचे प्रमाण कमी राहिले त्यामुळे पुढील वर्षाच्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याबरोबरचं चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. चारा टंचाईच्या पार्श्‍वभूमीवर महसूल विभागाकडून चाऱ्याची मागणी नोंदवून छावण्या उभारण्यात आल्या होत्या.

सटाणा, मालेगाव, नांदगाव, सिन्नर, देवळा, चांदवड, इगतपुरी, नाशिक या तालुक्यांमध्ये चारा टंचाई निर्माण झाल्याने मागणी नोंदविण्यात आली होती.

सटाणा मध्ये ७० हजार ३९३ मेट्रीक टन, मालेगाव तालुक्यात ९० हजार ८२३, नांदगाव तालुक्यात ८९ हजार ४६०, सिन्नर तालुक्यात एक लाख २३ हजार २९१, देवळा तालुक्यात ८९ हजार २६२, चांदवड तालुक्यात एक लाख ३० हजार ४३०.५ मेट्रीक टन, इगतपुरी तालुक्यात दोन लाख १८ हजार ५१७ मेट्रीक टन, नाशिक तालुक्यात ७७ हजार १४० मेट्रीक असा एकूण आठ लाख ६२ हजार ३२७.५ मेट्रीक टन चारा उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानंतर मात्र सलग तीन वर्षे चांगला पाऊस झाल्याने चाऱ्याची मागणी नोंदविण्यात आली नाही. यावर्षी देखील अद्यापपर्यंत चारा मागणी नोंदविली न गेल्याने चारा टंचाईवर फुली पडली आहे.

साडेतेरा लाख जनावरांना चारा

दिंडोरी, बागलाण, पेठ, सुरगाणा, निफाड, कळवण या तालुक्यांमध्ये गेल्या चार वर्षांपासून चाऱ्याची मागणी नोंदविण्यात आलेली नव्हती. यंदाही तीच परिस्थिती कायम आहे. ज्या आठ तालुक्यांमध्ये चारा टंचाई निर्माण झाली होती, तेथे तेरा लाख ४३ हजार ५३३ जनावरे होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com