esakal | नाट्यगृह सुरू करण्याबाबत सरकारचा वेळकाढूपणा : रंगकर्मींची भावना
sakal

बोलून बातमी शोधा

theater

नाट्यगृह सुरू करण्याबाबत सरकारचा वेळकाढूपणा : रंगकर्मींची भावना

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : श्रींच्या आगमनाने नाट्यगृह सुरू व्हावी, अशी आशा रंगकर्मींना सरकारकडून होती. परंतु, आंदोलन करूनही रंगकर्मींना निराशा पदरी पडली आहे. ५ नोव्हेंबरला नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर रंगकर्मींकडून नाराजी व्यक्त होत असून, नाट्यगृह सुरू करण्याबाबत सरकार वेळकाढूपणा करत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

नवीन रंगकर्मींची पाठांतराची सवय मोडतेय

सर्व निर्बंध शिथिल होत असताना नाट्यगृह बंद का, असा प्रश्‍न उपस्थित होत असताना गेल्या महिन्यात रंगकर्मींकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आली. रंगकर्मींना सप्टेंबरमध्ये नाट्यगृह सुरू होतील, अशी आशा होती. तसे आश्‍वासन सरकारकडून देण्यात आले होते. नोव्हेंबरमध्ये ५० टक्के क्षमेतेसह नाट्यगृह सुरू करण्याबाबत गेल्या आठवड्यात सरकारने निर्णय घेतला. तिसरी लाट (Corona Third Wave) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येणार, असा सरकारचा अंदाज आहे. दोन महिन्यानंतर तिसरी लाट आल्यास हा निर्णय कायम असेल, काय असाही प्रश्‍न रंगकर्मी विचारत आहे. कोरोनाचे सगळे नियम पाळून नाट्यगृह या आधीच सुरू होणे गरजेचे होते.

''अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने आंदोलन केले, परंतु सरकारला जो निर्णय घ्यायचा सरकारने तो घेतला आहे. सरकार रंगकर्मींसोबत दुजाभाव करत आहे. रंगकर्मींमध्ये निराशा पसरली आहे. नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट आल्यास ५ नोव्हेंबरला नाट्यगृह सुरू होतील काय, असा प्रश्‍न पडला आहे.'' - रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद

हेही वाचा: ऑक्सिजन निर्मितीत राज्यात नाशिकचा प्रथम क्रमांक - छगन भुजबळ

''राज्य शासनाने खरंतर नाट्यरसिकांना गाजरच दाखवले आहे. तिसरी लाट आणि तिसरी घंटा यांचा परस्पर काहीही संबंध नसतांना शासनाने मात्र तो मारुन मुटकुन निर्माण केला आहे. रंगकर्मींबाबत पक्षपातीपणाची भूमिका घेतलेली आहे.'' - श्रीराम वाघमारे, रंगकर्मी

''नाट्यगृह सप्टेंबरमध्ये सुरू झाले असते तर राज्यनाट्य स्पर्धा झाल्या असत्या. राज्यनाट्य स्पर्धा नसल्याने पाठांतराची नवीन रंगकर्मींना सवय राहिली नाही. दोन महिन्यांनी नाटक सुरू होणार असले तरी व्यावसायिक नाटकांपुढे स्थानिक कलावंतांचे काय असा प्रश्‍न पडला आहे.'' - राजेश शर्मा, लेखक- दिग्दर्शक

हेही वाचा: CoWIN चे नवीन फिचर! लसीकरण झाले की नाही समजणार

loading image
go to top