GPAT CUET Exam : जिपॅट 22 ला, तर सीयुईटी 25 पासून | GPAT CUET Exam GPAT on 22nd may will GET from 25th may nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

GPAT CUET Exam : जिपॅट 22 ला, तर सीयुईटी 25 पासून

GPAT CUET Exam : जिपॅट 22 ला, तर सीयुईटी 25 पासून

Nashik News : ग्रॅज्‍युएट फार्मसी ॲप्‍टीट्युड टेस्‍ट (जिपॅट) २०२३ ही परीक्षा येत्या २२ मेस, तर सीयुईटी (युजी) ही परीक्षा २५ ते २८ मे या कालावधीत राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणार आहे. याबाबत नॅशनल टेस्‍टींग एजन्यातर्फे सूचना जारी केल्‍या आहेत. (GPAT CUET Exam GPAT on 22nd may will GET from 25th may nashik news)

विद्यार्थ्यांनी परीक्षाकेंद्राच्‍या शहराबाबतचा तपशील आपल्‍या अर्ज क्रमांक व जन्‍माची दिनांक दाखल करुन प्राप्त करुन घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्र लवकरच उपलब्‍ध करुन दिले जाणार आहेत.

तसेच, देशभरातील केंद्रीय विद्यापीठ, अधिमत विद्यापीठांसह या प्रक्रियेत सहभागी झालेल्‍या विद्यापीठांमधील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीयुईटी (युजी) २०२३ या परीक्षेच्‍या माध्यमातून प्रवेश दिला जाणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या परीक्षेसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांनादेखील परीक्षा केंद्राच्‍या शहराचा तपशील जारी केलेला आहे. काही शहरांमध्ये नोंदणीकृत विद्यार्थ्यांची संख्या खुप जास्त आहे. अशा शहरांमध्ये १ व २ जून आणि ५ व ६ ते ८ जून या तारखा राखीव ठेवण्यात आल्‍या आहेत.

टॅग्स :Nashikexam