Grape Harvest : निफाड तालुक्यात द्राक्ष काढणीला सुरवात; पूरक व्यावसायांची उलाढाल वाढणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Grape harvest in Niphad taluka continues in rural areas due to start of grape harvest.

Grape Harvest : निफाड तालुक्यात द्राक्ष काढणीला सुरवात; पूरक व्यावसायांची उलाढाल वाढणार!

निफाड (जि. नाशिक) : देशभरात आपल्या अविट रसाळ गोडीमुळे प्रसिद्ध असणाऱ्या द्राक्षपंढरीत द्राक्ष २३ हजार हेक्टर होऊन अधिक क्षेत्रावर निफाड तालुक्यातील उगाव, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, निफाड गोदाकाठ परिसरात द्राक्षमाल काढणीच्या हंगामाला सुरवात झाली आहे.

त्यामुळे द्राक्ष खरेदीसाठी परप्रांतीय व्यापाऱ्यांबरोबरच कामगारांच्या आगमनाने रोजगाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. तालुक्याच्या ग्रामीण भागात बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारणीला सुरवात झली आहे. (Grape harvest begins in Niphad taluka turnover of complementary businesses will increase nashik news)

तालुक्यातील उगाव, वनसगाव, खडक माळेगाव, सोनेवाडी, शिवडी, खेडे, नांदुर्डी, सारोळे, रानवड, नैताळे, गोदाकाठ निफाड भागात द्राक्षबागांचे मोठे क्षेत्र आहे. या गावांना द्राक्षमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी आवश्यक सोयी सुविधांसह व्यापाऱ्यांची उपलब्धी उगावला आहे.

त्यामुळे उगाव परिसरातील सर्वच रस्ते वाहनांसह मजूर वर्गाच्या गर्दीने फुलेलेले दिसतात. परराज्यातील बनारस, कोलकता, पटणा, गोरखपूर, बिलासपूर, अलाहाबाद, संभलपूर, महू आदी प्रमुख बाजारपेठांतील व्यापारी अन त्यांचे कमिशन एजंट द्राक्षपंढरीत दाखल होत आहे.

द्राक्षमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था उगाव, पिंपळगाव येथील वाहतूकदार ट्रान्स्पोर्टमार्फत होत आहे. द्राक्ष उत्पादन घेण्यात पुढे असलेला निफाड तालुका द्राक्षपंढरी म्हणून गेल्या दशकापासून देशासह परदेशातील बाजारपेठेत आपली वेगळी प्रतिमा बनवून आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

रोज द्राक्ष उत्पादकांच्या बागेत जाण्यापूर्वी व्यापारी राहत असलेल्या खोलीवर मजुरांची रेलचेल साडेसहाला सुरू होते. तेथे पँकर शिबडीवाला पिछेवाला आणि एक जीप, टेम्पो पिक-अप हे वाहन द्राक्ष उत्पादकांच्या बागेत ठरविलेला द्राक्षमाल आणण्यासाठी रवाना होतात.

दिवसभर द्राक्षमाल पँकिंग करून तो पिक-अप टेम्पोद्वारे ट्रान्स्पोर्टपर्यंत आणून ट्रकमध्ये भरून पुढे बाजारपेठेकडे रवाना होतो.

पूरक व्यवसायाला चालना

तालुक्यातील पंचवीस हजार हजार हेक्टरवर द्राक्ष हंगामाला सुरवात झाल्यामुळे या कालावधीत
द्राक्षमाल बाजारपेठेसाठी रवाना करण्यासाठी आवश्यक खोकी, रद्दी, क्रेटेल, सिल्व्हर, गमटेप, दोरी यांसारख्या पूरक वसतू विक्रेत्यांच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

झाडाखाली द्राक्षमाल खुडणाऱ्यांची संख्या वाढली

एकाच दिवसात रान खाली होत असल्याने मजूर आणि इतर खर्चांमध्ये होणारी बचत पाहता झाडाखाली माल देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. एकट्या नैताळेत दहा ते बारा व्यापारी असून, प्रत्येक व्यापाऱ्याकडे शंभराच्यावर मजूर आहेत.

ते एकाच दिवसाला एक एकर रान खाली करतात. त्यामुळे पाच-सहा दिवस चालणारा खुडा एकाच दिवशी होत असल्यामुळे वेळ आणि मजुरीची बचत होते.

"व्यापारी व द्राक्ष उत्पादक यांच्यादरम्यान होणारे व्यवहार केवळ विश्वासावर होतात, त्यास कायदेशीर आधार नसतो. तोंडी बोलीवर सुरवातीला रोखीचा नंतर चार-दोन दिवसांच्या उधारीचा व्यवहार होत जाऊन व्यापाऱ्याच्या उधारीची रक्कम वाढत जाते, यातूनच फसवणुकीचे प्रकार घडतात. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेत आपल्या द्राक्षांचे व्यवहार करावेत. जेणेकरून आपण अडचणीत सापडणार नाही, याची काळजी घ्यावी."- योगेश रायते, खडक माळेगाव

व्यापाऱ्यांची नोंद, रोखीनेच व्यवहार व्हावे

"परराज्यातून द्राक्ष उत्पादक भागात आलेल्या द्राक्ष व्यापाऱ्यांची ग्रामपंचायत व पोलिस ठाण्यात छायाचित्र, आधारकार्ड इत्यादी महत्त्वाच्या कागदपत्रांसह नोंद ठेवायला हवी. द्राक्ष उत्पादकांनी व्यापाऱ्यांशी रोखीनेच व्यवहार करावेत. कारण व्यापारी पलायनाचे प्रकार सतत होत असतात. सावधगिरी बाळगणे हिताचे आहे."

- छोटूकाका पानगव्हाणे, अध्यक्ष, द्राक्ष संघर्ष समिती, उगाव