नाशिकहून मुंबईला ये- जा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार

Citylink
Citylinkesakal

नाशिक : महापालिकेच्या (NMC) सिटीलिंक कंपनीकडून सुरू करण्यात आलेल्या बससेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवेचा विस्तार करताना आता थेट जिल्ह्याची हद्द सोडून कासारा रेल्वे कनेक्ट सेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, प्रयत्नांना यश आल्यास नाशिकहून मुंबईला ये- जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय ठरणार आहे.

बस सेवेचा विस्तार

नाशिक (Nashik) महानगर परिवहन कंपनीकडून मागील वर्षाच्या जुलै महिन्यापासून शहर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. बससेवा सुरू करताना आर्थिक तोटा होईल ही बाब लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात बसची संख्या कमी ठेवली. त्यानंतर लॉकडाउनचे अनलॉकमध्ये रूपांतर होत असताना बस सेवेचा विस्तार वाढविण्यात आला. याच दरम्यान शैक्षणिक संस्था सुरू झाल्याने सिटी कंपनीला मोठा दिलासा मिळाला.

ग्रामीण भागात बससेवेला चांगला प्रतिसाद

किलोमीटर मागे जवळपास 14 ते 15 रुपये तोटा येत असल्याची बाब वार्षिक सर्वेक्षण अहवालातून स्पष्ट झाली. त्यामुळे तोटा कमी करण्यासाठी ग्रामीण भागात विस्तार करण्याचे निश्चित करण्यात आले. त्या अनुषंगाने दिंडोरी, पिंपळगाव बसवंत, माडसांगवी, सिन्नर, ओझर, त्र्यंबकेश्वर, घोटी या निमशहरी गावांपर्यंत बससेवेचा विस्तार करण्यात आला. विशेष म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागात बससेवेला चांगला प्रतिसाद मिळाला. बस सेवा तोट्यात चालू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या मागणीनुसार आता बससेवेचा विस्तार कसारा रेल्वे स्टेशनपर्यंत केला जाणार आहे.

चाकरमान्यांना दिलासा मिळणार

नाशिकहून कल्याण, ठाणे व मुंबई भागात मोठ्या प्रमाणात प्रवासी जातात. त्याचबरोबर दररोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या पण लक्षणीय आहे. मात्र, कोरोनामुळे रेल्वे ट्रेनच्या संख्येवर मर्यादा आली. त्याचबरोबर असंख्य प्रवाशांना नियमित ट्रेन पकडता येत नाही. त्यासाठी लोकल हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, कसारा स्थानकापर्यंत लोकल ट्रेन वेळेत आली तरी त्यापुढचा प्रवास मात्र खडतर बनतो. बसची संख्या पुरेशी नाही, तर खासगी वाहतूकदारांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी होते.

Citylink
Nashik : सिटीलिंकतर्फे विद्यार्थ्यांसाठी बसफेरी

कसारा लोकल कनेक्टेड बस सुरू केली जाणार...

त्यामुळे सरकारी बस सेवा सुरू करण्याची अनेक वर्षांची मागणी होती. सिटीलिंक कंपनीकडे आलेल्या मागणीनुसार कसारा लोकल कनेक्टेड बस सुरू केली जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच कंपनीच्या मासिक बैठकीत ठेवला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Citylink
सिन्नर, पिंपळगाव (बसवंत) मार्गावर CITILINC जलद बससेवा; असे आहे वेळापत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com