Nashik News: तक्रार निवारण कक्षाला मिळाला पूर्णवेळ कर्मचारी! सिडकोवासीयांमध्ये समाधान | Grievance redressal cell got full time staff Contentment among residents of cidco Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Staff sitting for grievance redressal of citizens in grievance redressal room

Nashik News: तक्रार निवारण कक्षाला मिळाला पूर्णवेळ कर्मचारी! सिडकोवासीयांमध्ये समाधान

Nashik News : सिडको विभागीय कार्यालयात सिडकोवासीयांच्या विविध तक्रारी नोंदवून घेण्यासाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

मात्र १९ मे पासून नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी येथे एकही कर्मचारी अथवा अधिकारीच उपलब्ध नसल्याबाबत मंगळवारी (ता. २३) ‘सकाळ’ मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सिडको विभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ कर्मचारी नेमणूक केली आहे. (Grievance redressal cell got full time staff Contentment among residents of cidco Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सिडको विभागीय कार्यालयात गेल्या चार दिवसांपासून तक्रार निवारण कक्षात सिडकोवासीयांच्या समस्या फोनद्वारे व कार्यालयात लेखी स्वरूपात घेऊन संबंधित विभागास कळवण्याकरिता असलेल्या तक्रार निवारण कक्षात कर्मचारी नसल्या कारणास्तव सिडकोवासीयांची चांगलीच परवड झाली होती.

याबाबत सकाळने ‘बदल्यांच्या खेळात नाशिककर बेहाल’ या मथळ्याखाली या समस्येवर प्रकाश झोत टाकल्यानंतर सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी या वृत्ताची दखल घेत लागलीच पूर्ण वेळ कर्मचारी नियुक्ती केल्याने सिडकोवासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nashiknmc