Guardian Minister Bhuse Meeting : आकृतिबंधावर पालकमंत्री काय बोलणार?

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal

नाशिक : पालकमंत्री पदाची नव्याने सूत्रे हाती घेतलेल्या दादा भुसे यांची विविध विकास कामासंदर्भात चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (ता. ३०) महापालिका मुख्यालयात बैठक होणार आहे. बैठकीच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित असलेल्या महापालिकेच्या रिक्तपदे तसेच आकृतिबंध आराखडा मंजुरी संदर्भात निर्णय घेतील, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. (Guardian Minister Dada Bhuse Important meeting in NMC Nashik Nashik Latest Marathi News)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी चार महिन्यांपूर्वी महापालिकेत बैठक घेतली होती. महापालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मंत्रालय स्तरावर उत्तर शोधण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, त्यानंतर राज्यातील सरकार गडगडले व मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. दीड महिने पालकमंत्री नव्हते.

आता दादा भुसे यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे आली आहेत. भुसे हे नाशिक जिल्ह्यातील असल्याने त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. त्यात शिंदे गटातील एक विश्वासू मंत्री म्हणूनदेखील त्यांच्याकडे पाहिले जात असल्याने महापालिका संदर्भातील प्रश्न ते सोडवतील, या अपेक्षेने कर्मचारी त्यांच्याकडे पाहत आहे. २०१७ ला तत्कालीन नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी महापालिकेत दौरा केला होता.

Dada Bhuse news
नाशिक रोड रेल्वे स्थानकावर होणार Electrical Vehicle Charging Point

या वेळी शासनाकडे प्रलंबित असलेला १४००० पदांचा आकृतिबंध मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही शासन स्तरावर प्रस्ताव धूळखात पडून आहे. छगन भुजबळ यांनीदेखील शासन दरबारी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सरकार बदलले. आता दादा भुसे यांच्याकडे सूत्रे आली आहेत. त्यामुळे रिक्तपदांसह आकृतिबंध मंजूर करण्यासाठी शासन दरबारी ते प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विविध प्रश्नांवर होणार चर्चा

शुक्रवारी दुपारी साडेचार वाजता स्थायी समितीच्या सभागृहात पालकमंत्री दादा भुसे बैठक घेतील. शासनाकडे प्रलंबित असलेला नोकर भरतीचा आकृतिबंधासह विविध समस्यांचा ऊहापोह होईल. त्याचबरोबर सध्या शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, त्यावरदेखील पालकमंत्री भुसे सूचना करतील असे बोलले जात आहे.

Dada Bhuse news
Farmer Agitation : शेतकरी संघटनेचे महामार्गावर रास्तारोको आंदोलन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com