
Dada Bhuse : जलजीवन योजनेमुळे प्रत्येकाला शुध्द पाणी : दादा भुसे
मालेगाव (जि. नाशिक) : श्रीक्षेत्र चंदनपुरी येथील पिण्याच्या पाण्याचा (Water) प्रश्न जलजीवन मिशन अंतर्गतच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सुटणार आहे. (Guardian Minister Dada Bhuse statement about jal jeevan mission nashik news)
गावातील प्रत्येक घराला नळाने स्वच्छ व शुध्द पाणी मिळेल असे पालकमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगितले. चंदनपुरी येथील जलजीवन मिशनतंर्गत स्वतंत्र गाव नळ पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
सरपंच विनोद शेलार, जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अधिकारी ए. एम. पगार, शाखा अभियंता आर. एस. जाधव, ग्रामविकास अधिकारी टी. एम. बच्छाव आदी व्यासपीठावर होते.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
श्री. भुसे म्हणाले की, या योजनेला ११ कोटी १६ लाख ८४ हजार रुपये मंजूर झाले आहेत. योजनेच्या माध्यमातून चंदनपुरी गावासह मनमाड चौफुली, शेलारनगर, एकलव्य नगर,
शबरीमाता नगर व आमलुक नगर या वाड्यांचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. श्री. पगार यांनी नळ पाणीपुरवठा योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.