
Dada Bhuse News: जवान सापडत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार : पालकमंत्री दादा भुसे
सिन्नर (जि. नाशिक) : केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवानाच काल दुचाकीवरून तोल जाऊन गोदावरी उजवा कालव्यात पडल्याने कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलीला वाचविण्यात यश आलेले असून त्यानंतर जवान हा वाहून गेल्याने सुमारे 18 ते 20 तास होऊन अजूनही शोध लागलेला नसताना एन डी आरचे पथक गुरुवारी सायंकाळपासून दाखल झालेले असून शोध सुरू आहे.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटना स्थळाची पाहणी केली. (Guardian Minister Dada Bhuse statement regarding i will stay here on Soldier Missing Case nashik news)
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
...तोवर मी इथुन कुठेही हलणार नाही
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नाफेडची बैठक आणि निफाड तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा रद्द करून तातडीने सिन्नरला धाव घेतल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
आपण मागच्या सरकारमध्ये सैनिक कल्याण विभाग सांभाळला आहे. सैनिकांप्रती असणाऱ्या आदरभावामुळेच सर्व बैठका रद्द करून परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतः आलो, जोपर्यंत बेपत्ता जवान सापडत नाही तोपर्यंत आपण स्वतः इथेच थांबणार असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
माजी आमदार राजाभाऊ वाजे उदय सांगळे सिमंतिनी कोकाटे देखील घटनास्थळी थांबून आहेत. दिंडोरी आणि निफाड येथील एन डी आर एफ पथक शोधकार्यात सकाळपासून बचाव कार्यात जुंपलेले आहे.
प्रांत अधिकारी डॉ. अर्चना पठारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ तांबे, सिन्नरचे तहसीलदार एकनाथ बंगाळे, यांच्यासह महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी देखील उपस्थित घटनास्थळी हजर आहेत. सकाळी 11 वाजेच्या सुमारास कॅनॉलचे आवर्तन बंद करण्यात आलेले आहे.