Gudhi Padwa 2023 : मांगल्याच्या गुढीसाठी बाजारात उत्साह! खरेदीसाठी उसळली गर्दी

Gudhi Padwa 2023
Gudhi Padwa 2023esakal

नाशिक : गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी सायंकाळी शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठा उत्साह जाणवला.

गुढीसाठी लागणाऱ्या काठीसह अन्य साहित्याच्या खरेदीसाठी नाशिककर मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने सायंकाळी मेनरोड, रविवार कारंजा, शालिमार, दहिपूल आदी भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. बाजारात यंदाही नॅनो गुढ्यांची क्रेझ कायम असल्याचे दिसून आले. (Gudhi Padwa festival 2023 Excitement in market for Mangali Gudhi nashik news)

गुढी उभारण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या लांबीच्या काठ्या बाजारात मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत. त्या वीस रुपयांपासून पन्नास रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. वेळूच्या काठ्या मात्र भरीव व टिकाऊ असल्याने त्या शंभर रुपये नग याप्रमाणे उपलब्ध आहेत. याशिवाय गुढीसाठी लागणारा कडुनिंब, आंब्याची पानेही विक्रीसाठी दाखल झाली आहेत.

हारकड्यांना मोठी मागणी

साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणा-या हारकड्यांचे गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. घाऊक बाजारात शंभर ते एकशेवीस रुपये याप्रमाणे उपलब्ध असलेले छोटे हार किरकोळ बाजारात तीस रूपयांत तर मोठे हार पन्नास रूपयांत उपलब्ध होते. याशिवाय छोटे कडे वीस तर मोठे कडे चाळीस रूपयांत उपलब्ध होते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

Gudhi Padwa 2023
Gudhi Padwa च्या दिवशी गुढी का उभारतात? | Dr. Sunil Tambe

नॅनो गुढीची क्रेझ कायम

छोट्या आस्थापना, हॉटेल्स, दुकाने, चारचाकी वाहने, देवघर आदी ठिकाणी नॅनो गुढी उभारण्याची प्रथा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. शोपीस ठरलेल्या अशा नॅनो गुढ्या बाजारात पन्नास रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

कोरोना उद्रेकानंतर प्रथमच नॅनो गुढ्यांच्या विक्रीस यंदा मोठा प्रतिसाद लाभल्याचे दक्षता भावसार यांनी सांगितले. यंदा गुढी तयार करण्यासाठी साहित्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे, मात्र अनेक ग्राहक बऱ्याच वर्षांपासून खरेदीसाठी येत असल्याने गतवर्षीच्या दरांतच यंदाही नॅनो गुढ्यांची विक्री सुरू असल्याचे दक्षता भावसार यांनी सांगितले.

"भाद्रपद या शनीच्या नक्षत्रात (दुपारी २ वाजून १४ मिनिटांपर्यंत त्यानंतर बुध ग्रहाचे रेवती नक्षत्र) व गुरूच्या मीन या राशीत चंद्र असताना शोभन या हिंदूंच्या नवीन संवत्सराचा आरंभ होत आहे. रात्री आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत प्रतिपदा तिथी आहे. त्यामुळे पहाटे पाच ते सकाळी नऊ या लाभयोगात गुढी उभारावी." - डॉ. नरेंद्र धारणे, धर्मशास्त्र अभ्यासक.

Gudhi Padwa 2023
Gudhi Padwa : गुढीपाडव्याला हवं असेल गोडधोड तर पटकन करा केशर श्रीखंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com