Nashik News : दिंडोरीत गुरुमाऊलींचे आज सेवेकऱ्यांशी हितगूज

Gurumauli Annasaheb More
Gurumauli Annasaheb More esakal

Nashik News : दिंडोरी येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रधान केंद्रात दर गुरुवार आणि रविवारी हजारो सेवेकरी, भाविक स्वामी समर्थ महाराज आणि गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या भेटीसाठी येत असतात. या सर्वांशी दर गुरुवार आणि रविवारी गुरुमाऊली हितगूज साधतात. (Gurumauli conversation with servants today in Dindori nashik news)

उद्या सुद्धा हा उपक्रम होणार असून येणाऱ्या भाविकांच्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि समाज म्हणून समोर उभ्या असलेल्या विविध समस्या, अडीअडचणी, प्रश्नांचा ऊहापोह करून त्यावर करावयाच्या उपाययोजना बाबत गुरुमाऊली चर्चा करतील.

आज समाजासमोर विविध घटकांचे विविध प्रश्न आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर शेतकरी बेजार होऊन आत्महत्या करीत आहे, युवकांना उच्च शिक्षण घेऊन नोकऱ्या नाहीत, युवक युवतींना अपेक्षित वधू, वर नाहीत, विवाह प्रलंबित आहेत, विवाहिताना अपत्य प्राप्ती नाही,

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More
Sant Nivruttinath Palakhi : निवृत्तीनाथ पालखीची जिल्हा सरहद्दीवरील वाट खड्ड्यांतून...

कुटुंबात मनःशांती नाही, आजार त्रस्त करीत आहेत, उद्योग, धंदे, व्यापारात तोटा होतो आहे, अशा कितीतरी समस्या आज आपणास सतावून सोडत आहेत. या प्रश्नांवर समुपदेशन आणि आध्यात्मिक मार्गदर्शन गुरुमाऊली करतील.

सकाळी आठ वाजता भूपाळी व साडेदहा वाजता नैवेद्य आरतीची सेवा रुजू होईल. यानंतर गुरुमाऊली हितगूज करतील. दिवसभर प्रश्नोत्तरे कार्यक्रमातून ज्येष्ठ सेवेकरी मार्गदर्शन करतील.दुपारी पालखी सोहळ्याचा आनंद सेवेकरी घेतील. सायंकाळी आरती होईल.

Gurumauli Annasaheb More
International Satsang Ceremony : आंतरराष्ट्रीय सत्संगासााठी सेवेकरी नेपाळला रवाना : चंद्रकांतदादा मोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com