Har Ghar Jal : जिल्ह्यातील 111 गावांमधील कुटुंबांना नळाद्वारे पाणी

tap water supply nashik
tap water supply nashikesakal

नाशिक : जल जीवन मिशन अभियानांतर्गत १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील १०० टक्के वैयक्तिक आणि संस्थात्मक नळ जोडण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने जिल्ह्यातील १११ गावांना ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. (Har Ghar Jal Tap water to families in 111 villages of district Nashik Latest Marathi News)

देशातील प्रत्येक कुटुंबाला घरगुती स्तरावर नळाव्दारे नियमित, शुद्ध व ५५ लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्र शासनाने जल जीवन मिशनची सुरवात केलेली आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना नळ जोडणी देऊन शाश्‍वत पाणी पुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाण यांना नळाव्दारे पाणी पुरवठा करावयाचा आहे.

या निकषानुसार पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांना शासनाच्या निर्देशानुसार हर घर जल गाव म्हणून घोषित करावयाचे आहे. त्यानुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतर्गत जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे काम सुरु करण्यात आलेले आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेकडून जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली कामे विहित वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी सर्व यंत्रणेचा नियमितपणे आढावा देखील वेळोवेळी सुरु होता.

tap water supply nashik
Monsoon Update : संततधार पावसाचा ऑगस्‍टमध्येही विक्रम

स्वातंत्राच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर जल गाव करणेसाठी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली जल उत्सव अभियान राबविण्यात आले. हर घर जल गावाचे निकष पूर्ण करणाऱ्या जिल्ह्यातील १११ गावांना १५ ऑगस्ट २०२२ रोजी ‘हर घर जल गाव’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत हर घर जल गावाचे निकष पूर्ण करणाऱ्या गावांमध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेव्दारे ठराव तसेच व्हिडिओ चित्रीकरणकरून व सदरची माहिती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर मोबाईल ॲपव्दारे भरल्यानंतर जिल्ह्यातील या गावांना हर घर जल गाव म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

जल उत्सव अभियान यशस्वितेसाठी गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षातील सर्व सल्लागार, तालुकास्तरावरील गटसमन्वयक, समूह समन्वयक, जलजीवन मिशन अंतर्गत तालुकास्तरावर कार्यरत कंत्राटी अभियंते यांनी परिश्रम घेतले.

तालुकानिहाय गावांची संख्या

बागलाण-६

चांदवड-६

देवळा-२

दिंडोरी-९

इगतपुरी-९

कळवण-१३

मालेगाव-४

नाशिक-१०

निफाड-९

पेठ-१३

सिन्नर-१६

सुरगाणा-७

त्रंबकेश्वर-४

येवला-३

tap water supply nashik
Corona Update : महिन्‍याभरानंतर कोरोनाचा बळी; दिवसभरात 19 पॉझिटिव्‍ह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com