नाशिक : खासगी ट्रॅव्हल्स व्यवसायाला सुगीचे दिवस

प्रवासी ४० ते ५० टक्क्यांनी वाढले
private travells
private travellssakal

जुने नाशिक : आगामी दिवाळी सण आणि एसटी महामंडळाच्या आंदोलनाच्या परिणामामुळे नागरिकांची खासगी ट्रॅव्हल्सला पसंती मिळत आहे. प्रवासी संख्या वाढल्याने ट्रॅव्हल्स व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक देण्यात आली होती. कर्मचारी आणि मंडळांचे अधिकाऱ्यांबरोबर चर्चेनंतर एसटी महामंडळाकडून आंदोलन मागे घेण्यात आले. असे असले तरी अनेक मार्गावरील बसच्या फेऱ्या कमी करण्यात आले आहे.

नागरिक मात्र द्विधा मनःस्थितीत असल्याने त्यांच्याकडून वेळेवर गोंधळ उडायला नको म्हणून खासगी ट्रॅव्हल्सला पसंती देत आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सची प्रवासी संख्या सुमारे ४० ते ५० टक्क्यांनी वाढली आहे. वेळेवर धावपळ नको म्हणून अनेक नागरिकांकडून फोन, तसेच ऑनलाइन बुकिंग करून घेत आहे. याशिवाय ट्रॅव्हल्सच्या कार्यालय बाहेरदेखील प्रवाशांची गर्दी बघावयास मिळत आहे. प्रवाशांची होणारी गर्दी आणि डिझेलचे वाढलेले दर यामुळे तिकिटांच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. ज्या मार्गावरील दर पाचशे ते सहाशे रुपये होते, तेच दर आता सातशे ते आठशे रुपयांपर्यंत गेले आहे. शिवाय दिवाळी असल्याने येणाऱ्या दिवसात आणखी प्रवासी संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यानिमित्ताने ट्रॅव्हल्स चालकांकडून अतिरिक्त बस सुरू करण्यात आल्याची माहिती ट्रॅव्हल्स चालकांकडून देण्यात आली.

private travells
बँकांचे नियम बदलणार; सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री

यंदाची दिवाळी साजरी

गेल्यावर्षी शहरात कोरोनाचा मोठा कहर होता. प्रशासनाकडून लॉकडाउनसह कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. प्रत्येकाची दिवाळी घरातच साध्या पद्धतीने साजरी झाली. त्याचा परिणाम ट्रॅव्हल्स चालकांवरदेखील झाला. दिवाळीमध्ये त्यांच्या व्यवसायात भरभराट असते. त्यातून आर्थिक परिस्थिती चांगली झाल्याने त्यांची दिवाळीदेखील उत्साहात साजरी होते. गेल्या वर्षी कोरोनामुळे तसे होऊ शकले नाही. यंदा मात्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. नागरिक दिवाळी साजरी करण्यासाठी आपापल्या मूळ गावी जात आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय भरभराट आली आहे. यामुळे नागरिकांसह ट्रॅव्हल्स चालकांची दिवाळीदेखील उत्साहात साजरी होणार आहे.

"प्रवासी संख्या आणि डिझेलचे दर वाढल्याने तिकिटाच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता. अतिरिक्त बस सुरू करण्यात आली आहे."

- गुड्डू सय्यद, ट्रॅव्हल्स चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com