
नाशिक : दिवसा उन्हाचा तडाखा, सायंकाळी थंडीने हुडहुडी
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून थंडीने गारठलेल्या नाशिककरांना सध्या मिश्र वातावरणाची अनुभूती येत आहे. दिवसा कडक उन्हाचा तडाखा जाणवत असून, सायंकाळनंतर मात्र वातावरणातील थंडीने हुडहुडी भरत आहे. अशात रविवारी नाशिकचे किमान तामपान ८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर ३१.३ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली.
हेही वाचा: कोण आहे पद्मश्री मिळवणारा शेतकरी 'टनेल मॅन'? वाचा प्रेरणादायी संघर्ष
नाशिकचा पारा घसरताना, वातावरणातील शीतलहरींमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण व वाढलेल्या थंडीमुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला होता. मात्र, आता प्रखर सूर्यकिरणांमुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. सध्या दिवसा कडक उन्हाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे, तर सायंकाळनंतर वातावरणात कमालीचा गारवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे सायंकाळनंतर शेकोट्या पेटत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत होते. अशात किमान व कमाल तापमानात मोठी तफावत बघायला मिळते आहे. रविवारी नाशिकचे किमान तापमान ८.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले, तर किमान तापमान थेट ३१.३ अंश सेल्सिअसवर पोचले होते. येते काही दिवस नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
आरोग्य सांभाळण्याचा सल्ला
काही दिवसांपूर्वी वातावरणातील बदलांमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला होता. श्वसनाचे विकार असलेल्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात होता. सध्या ऊन आणि थंडी असे मिश्र वातावरण आहे. अशा वातावरणातही आरोग्य सांभाळण्याची आवश्यकता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
Web Title: Heat Of The Day Cold In Evening Temperature Fluctuation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..