
Unseasonal Rain :चांदवड तालुक्यात जोरदार पावसासह गारपीट
चांदवड (जि. नाशिक) : चांदवड तालुक्याच्या पुर्व भागातील वाद वराडी परीसरात सायंकाळी साडेसात वाजता जोरदार गारपीट झाली. (heavy hailstorm unseasonal rain occurred Chandwad taluka nashik news)
अचानक झालेल्या जोरदार गारपीटीने शेतकऱ्यांची प्रचंड धावपळ उडाली. जवळपास अर्धातास चाललेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. सुपारीच्या आकाराच्या गारांनी कांदा, गहु, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले.
अगोदरच त्रस्त असलेल्या या भागातील शेतकरी अवकाळीमुळे अक्षरशः कोलमडून गेला आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची काढणी करून ठेवलेली होती, तर काही शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक काढणीला आलेले आहे. अगोदरच कांद्याला भाव नाही.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
त्यात आता होत्याचं नव्हतं झालं. गहु भुईसपाट झाला तर हरभरा पुर्ण वाया गेला. आता काहीच शिल्लक राहिले नसल्याने इथला शेतकरी रडकुंडीला आला आहे. तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.