esakal | राज्यात शनिवारपासून वळीव पावसाचा अंदाज! 'या' जिल्ह्यांत राहणार प्रमाण अधिक
sakal

बोलून बातमी शोधा

rain

राज्यात शनिवारपासून वळीव पावसाचा अंदाज! अभ्यासक सांगतात..

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्याच्या विविध भागांत येत्या २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत वळीव तथा मुसळधार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र अभ्यासकांनी वर्तविला आहे. तसेच, परतीच्या पावसाचे १३ ते १७ ऑक्टोबर या काळात आगमन होण्याची शक्यता अभ्यासकांना वाटत आहे. परंतु 'या' जिल्ह्यांत वळीव पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता अभ्यासकांना वाटते आहे.

राज्यात वळीव पावसाचा अंदाज

अतिवृष्टीने कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रात कृषीचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या ९ सप्टेंबरच्या प्राथमिक अहवालानुसार राज्यातील १४ जिल्ह्यांत अतिवृष्टी तथा पुरामुळे सहा लाख ५० हजार ३४५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ज्वारी, बाजरी, कापूस, मका, सोयाबीन, ऊस, कांदा आणि फळ पिकांचा समावेश आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यावर नुकसानीची नेमकी स्थिती पुढे येण्यास मदत होईल. दरम्यान, हवामानशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये २५ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत, तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात २८ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरपर्यंत आणि पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणात १ ते ३ ऑक्टोबरला वळीव पावसाचा अंदाज आहे.

हेही वाचा: शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत - अनंत गिते

'या' जिल्ह्यांत राहणार प्रमाण अधिक

परतीचा पाऊस १३ ते १७ ऑक्टोबर या काळात सुरू होण्याची शक्यता वर्तवत असताना हा पाऊस झाल्यावर चार दिवस वळीव पाऊस संपूर्ण राज्यात होण्याचा अंदाज आहे. याशिवाय सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांत वळीव पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता अभ्यासकांना वाटते आहे. विभागनिहाय आतापर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी अशी (कंसात गेल्या वर्षी २० सप्टेंबरपर्यंत झालेल्या पावसाची टक्केवारी) : कोकण- १२१.४ (१०४.८), नाशिक- ८६.४ (१०९.३), पुणे- ८४.५ (९५), औरंगाबाद- १३२.३ (११७.६), अमरावती- ११४.५ (१०२.३), नागपूर- १००.८ (९२.४). एकूण- ११३.१ (१०६.४).

राज्यात ७४.८ टक्के जलसाठा (आकडे टक्क्यांमध्ये)

विभाग प्रकल्पांची संख्या आतापर्यंतचा जलसाठा गेल्या वर्षीचा जलसाठा

अमरावती ४४६ ७५.२७ ७७.९६

औरंगाबाद ९६४ ६१.१५ ७२.०७

कोकण १७६ ८७.६७ ८३.३८

नागपूर ३८४ ६७.४२ ८१.५९

नाशिक ५७१ ६९.८३ ८४.७४

पुणे ७२६ ८२.५३ ८८.१८

एकूण ३२६७ ७४.८ ८२.५७

हेही वाचा: संगमनेर : बसचालकाची आत्महत्या; एसटी विभागाला झटका

loading image
go to top