राष्ट्रीय कॅनोईंग स्पर्धेत हेमंत हिरे भारतात पहिला! पिंपळगाव महाविद्यालयाचा विद्यार्थी | Hemant Hire first in India in National Canoeing Championship Student of Pimpalgaon College nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

While felicitating Hemant Here, MVP General Secretary Adv. Nitin Thackeray, Chairman Balasaheb Kshirsagar etc

Canoeing Championship: राष्ट्रीय कॅनोईंग स्पर्धेत हेमंत हिरे भारतात पहिला! पिंपळगाव महाविद्यालयाचा विद्यार्थी

Canoeing Championship : मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या पिंपळगाव बसवंत येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा खेळाडू हेमंत हिरे यांनी टिहरी (उत्तराखंड) येथील राष्ट्रीय वरिष्ठ गट कॅनोईंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.

२०० मीटरच्या शर्यतीत महाराष्ट्राला २४ वर्षानंतर प्रथमच सुवर्णपदक मिळाले आहे. (Hemant Hire first in India in National Canoeing Championship Student of Pimpalgaon College nashik)

हेमंत हिरे याच्या यशाबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराव मोगल, अंबादास बनकर, शिक्षणाधिकारी डॉ. एन. के. जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, शिक्षणाधिकारी डी. डी. जाधव, प्राचार्य डॉ. ज्ञानोबा ढगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

स्पर्धेत एकूण २४ राज्यातील खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेतून गोवा येथे होणाऱ्या नॅशनल गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून हेमंत हिरे व साद पटेल या महाविद्यालयाच्या खेळाडूंची निवड झाली आहे.

सेनादलाच्या, पोलिस, साई या संघातील व्यवसाय खेळाडूंना पराभूत करताना ४२.७२ सेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवून हे सुवर्णपदक पटकावले. सेनादलाने रौप्यपदक व मध्य प्रदेशने कांस्यपदक पटकावले.

या यशाबद्दल भारतीय संघटनेचे अध्यक्ष प्रशांत कुशवाह, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष समीर मुणगेकर यांनी विशेष अभिनंदन केले. हेमंत हिरे यास क्रीडा मार्गदर्शक प्रा. हेमंत पाटील याचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :Nashiksports