
Nashik News : द्वारका परिसरात उच्च दाबाची वीजतार कोसळली!
जुने नाशिक : द्वारका परिसरात उच्च दाबाची वीजतार अचानक तुटून रस्त्यावर पडली. सुदैवाने दुर्घटना टळली. काही वेळ परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. (High voltage power line collapsed in Dwarka area Nashik News)
द्वारका चौकातील कावेरी हॉटेल समोर शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी वीज वितरण विभागाची उच्च दाबाची तार अचानक तुटून रस्त्यावर पडली. तार तुटली त्या वेळी सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही नव्हते.
इतर वेळेस नेहमी वाहनांसह बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांची गर्दी असते. घटना घडली त्या वेळी कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. तार तुटल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
त्यानंतर लगेचच तारांची दुरुस्ती करत वीजपुरवठा सुरळीत केला. तार तुटली त्या वेळी झालेल्या आवाजाने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली होते. वीज वितरण विभागाचे कर्मचारी वेळीच दाखल झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर कुठल्याही परिणाम झाला नाही. सुरळीत वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होणे टळली.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
काही दिवसांपूर्वी नानावली परिसरातही अशाच प्रकारे उच्च दाबाची तार कोसळण्याची घटना घडली होती. दैनंदिन त्या तारेमधून वी पुरवठा होत असतो. तरीदेखील वेळोवेळी तारांच्या जोडणीची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने कालांतराने तारांची जोडणी कुचकामी होऊन तार तुटण्याचे प्रकार घडत असतात.
या घटनेच्या बाबतीतही तसेच घडले असण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. वेळोवेळी त्यांची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.