होर्डिंग नियमावलीमुळे पोस्टर पुढाऱ्यांना चाप

सण- उत्सवातील विद्रूपीकरणाला प्रतिबंध
nashik-municipal-corporation
nashik-municipal-corporationsakal

नाशिक : चौकाचौकांत होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टरबाजीतून चमकोगिरी करणाऱ्या पोस्टर पुढाऱ्यांना पोलिसांच्या नियमावलीमुळे चाप बसतो आहे. होर्डिंग पोस्टर लावायचे असल्यास महापलिका आणि पोलिस अशा दोन्ही यंत्रणांची परवानगी घेऊन त्यानंतर सनदशीर मार्गाने पोस्टर लावण्याच्या नियमामुळे शहराचे विद्रूपीकरण कमी होत आहे. सण- उत्सवाच्या निमित्ताने चौकाचौकांतील पोस्टरबाजी कमी झाली आहे. पोलिसांनी शहराचे विद्रूपीकरण टाळण्यासह जाहीर बदनामी व टीकात्मक बॅनरबाजीतून राजकीय वातावरण कलुषित करणारे होर्डिंग लावण्यावर प्रतिबंध आणले आहे.

शहरात होर्डिंग लावण्यासाठी महापालिका, पोलिस यंत्रणेची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणेची एक खिडकी योजना, ऑनलाइन सुविधा दिली जाणार आहे. नाशिक शहराचा आदर्श याबाबतसुद्धा निवडणुकीतून करून दाखवून दिला जाईल. अनधिकृत होर्डिंग्ज कमी झाल्याने शहर विद्रूपीकरणापासून बचाव होईल. जे नियम मोडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि नियमात राहतील त्यांना सहकार्य केले जाईल, असे पोलिस यंत्रणेचे स्पष्ट धोरण आहे. पोलिस आयुक्तांनी विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना या धोरणाविषयी पूर्वकल्पना दिल्याने सगळ्याच राजकीय पक्षाकडून पोस्टरबाजीला आळा बसण्यास मदत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com