esakal | सटाणा-मालेगाव राज्य महामार्गावर भीषण आपघात; पती-पत्नी जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

accident

सटाणा-मालेगाव महामार्गावर भीषण आपघात; पती-पत्नी जागीच ठार

sakal_logo
By
रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक) : शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सटाणा - मालेगाव राज्य महामार्गावरील आराई फाट्यानजीक हॉटेल आशा गार्डन समोर आज मंगळवार (ता.25) रोजी सकाळी सात वाजता मालवाहू कंटेनर आणि मारुती सुझुकी सेलोरिओ या वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी जागीच ठार तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमीना तातडीने पुढील उपचारांसाठी मालेगाव येथे हलविण्यात आले तसेच सटाणा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. (husband and wife were killed in a horrific accident on the satana malegaon state highway)

दरवाजा तोडुन काढावे लागले बाहेर

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळाणे (ता.बागलाण) येथील जगन्नाथ खेताडे यांचे मावस भाऊ चिंतामण नाडेकर यांच्या मुलाचे गेल्या शुक्रवारी (ता.21) रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर चाळीसगाव येथे माहेरी पहिल्या मुळ साठी गेलेल्या नवरी मुलीला परत आणण्यासाठी आज सकाळी सात वाजता मुळाणे येथून जगन्नाथ खेताडे (वय 50), त्यांची पत्नी पार्वताबाई खेताडे (वय 45), रुपाली शांताराम नाडेकर (वय 30), परशराम विठ्ठल खेताडे (वय 40) हे चौघे मारुती सुझुकी सेलोरिओ (क्र.एम.एच. 41 ए.झेड. 8015) ने चाळीसगावकडे निघाले असताना सटाणा – मालेगाव राज्य महामार्गावरील आराई फाट्यानजीक असलेल्या हॉटेल आशा गार्डन समोर मालेगावकडून सटाणा शहराकडे भरधाव वेगाने येणार्‍या मालवाहू कंटेनर (क्र. के.ए. 01 ए.एम. 0771) ने मारुती सुझुकी सेलोरिओ वाहनाला जोरात धडक दिली. अपघातात जगन्नाथ खेताडे व त्यांची पत्नी पार्वताबाई खेताडे हे दोन्ही पती-पत्नी जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या रुपाली नाडेकर व परशराम खेताडे यांना तातडीने मालेगाव येथे हलविण्यात आले. अपघातात मारुती वाहनाचा चेंदामेंदा झाल्याने अपघाताचे स्वरूप अतिशय भयानक होते. मारुती वाहनातील मयत आणि जखमींना दरवाजा तोडुन बाहेर काढावे लागले. परिसरातील शेतकरी निलेश सोनवणे, अनिकेत सोनवणे, सचिन अहिरे, जितू पाटील यांनी याकामी मदत केली.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड घटनास्थळी भेट देऊन जखमींना उपचारांसाठी हलविले. मयत पती-पत्नीवर मुळाणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे मुळाणे गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण पाटील, अतुल आहिरे, विक्रम वडजे करीत आहेत.

सटाणा - मालेगाव राज्य महामार्गावरील अजमीर सौंदाणे फाटा ते जुनी शेमळी पर्यंतच्या रस्त्यावर गेल्या काही वर्षात झालेल्या शेकडो अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर आवश्यक तेथे गतिरोधक उभारून हा परिसर अपघातप्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करावा. तसे फलकही जागोजागी उभारावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंडितराव अहिरे यांनी केली आहे.

वाहनधारकांकडून अनेकवेळा वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत. अशा वाहनधारकांच्या चुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवायला देऊ नये. दुचाकीधारकांनी हेलमेट तर मोठ्या वाहनधारकांनी सीटबेल्ट लावून वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे आणि आपल्यासह इतरांचे जीवन सुरक्षित ठेवावे.

- नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक

(husband and wife were killed in a horrific accident on the satana malegaon state highway)