Nashik Crime : अवैध व्यावसायिकांची कोशिंबे येथे पोलिस पथकास धक्काबुक्की

Crime News
Crime Newsesakal

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यात अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्याच्या हेतूने पोलीस अधिक्षकांनी गठीत केलेले विशेष पथकावर कोशिंबे, ता. दिंडोरी येथील संशयीत अवैध व्यावसायीकांनी शिवीगाळ करीत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला असून घटनेनंतर संशयीत फरारी झाले असून वणी पोलिसांत सहा जणांवर सरकारी कामात अडथळा सह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाख करण्यात आला आहे. (Illegal businessmen attack police team in Koshimbe Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Pune Crime : पुण्यात भाजी कापण्याच्या चाकूनं प्रेयसीनं केली प्रियकराची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

याबाबात माहिती अशी की, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामिण यांचे अवैध धंदे उच्चाटन पथक यांना मिळालेल्या गुप्त माहीतीन्वये कोशिंबे, ता. दिंडोरी येथे एका दुकानात अवैध देशी विदेशी दारुचे मालाचे खोके असल्याबाबत माहीती मिळाल्याने फिर्यादी पथकातील ललीता फकिरबा सुरडकर, आडगांव, नाशिक ग्रामिण हे पथकातील सहकारी व साक्षीदारांसह बुधवार, ता. ३१ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सरकारी वाहनाने कोशिंबे येथे कारवाई करण्यासाठी गेले होते.

यावेळी संशयीत आरोपीस पथकास पाहुन आरडाओरड व शिवीगाळ करीत पथकावर दमबाजी करीत धावून आला. यावेळी पथकातील ललीता सुरडकर ह्या संशयीतास समजावुन सांगत असतांना त्याने पथकावर धक्काबुक्की करीत शिवीगाळ करीत करुन यापुढे तुम्ही आमचेकडे आले तर, तुमचा बेत पाहु, तुम्हाला येथुन परत जावु देणार नाही असे म्हणुन दमदाटी केली.

म्हणुन वणी पोलिसांत एकुण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांपैकी काही फरारी असल्याने पोलिसांनी संशयीताची नावे प्रसिध्दीसाठी दिलेली नाहीत.

Crime News
Jalgaon Crime News : रेल्वे पोलिसांनी 29 अल्पवयीन घेतले ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com