Nashik Crime : रेशनच्या मालाचा अवैध साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई | Illegal stock of ration goods seized by lcb nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime : रेशनच्या मालाचा अवैध साठा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Nashik Crime News : शहरातील मे.भिकचंद केशरमल पिचा राईस मिल मध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून रेशनचा माल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला अटक करण्यात आली आहे. (Illegal stock of ration goods seized by lcb nashik crime news)

केडगाव ( ता. दौंड ) जिल्हा पुणे येथून चेतन ट्रेडिंग कंपनी कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या जीवनावश्यक वस्तू काळ्या बाजारात विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शाहजी उमाप यांना मिळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला याबाबत घोटी शहरात पाचरण केले.

टेम्पो क्रमांक ( एमएच १५ : एफ.व्ही, ९०९४ ) यामध्ये शहरातील मे. भिकचंद केशरमल पिचा राईस मिल येथे स्थानिक गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यात १६ हजार९०० किलो वजनाचा चार लाख २९ हजार २६० रुपयांचा किंमती तांदूळ पकडण्यात आला.

याबाबत इगतपुरी पुरवठा कार्यालयातील नायब तहसीलदार भागवत ढोणे यांनी खात्री केली असता तो माल रेशनिंगचा असल्याचे नमूद करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावरून घोटी पोलीस ठाण्यात फिर्यादी गिरीश निकुंभ यांच्या तक्रारी नुसार मालाचा पुरवठा करणारे चेतन ट्रेडिंग कंपनी मालक, मध्यस्ती यांसह वाहन चालक विलास चौधरी ( वय २९ ) यांवर गुन्हा दाखल करून विलास चौधरी यास अटक करण्यात आली आहे.

घटनेत वापरलेले वाहन टेम्पो देखील जमा करण्यात आला असून एकूण १६ लाख २९ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रभाकर, निकम,पोलीस हवालदार गिरीश निकुंभ,रवींद्र टर्ले,मधुकर गायकवाड,भुषण मोरे,बापूराव पारखे यांनी कामकाज पाहिले तर घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास ह्या करत आहे.

टॅग्स :NashikcrimeRation Card