Nashik Crime News : रागाच्या भरात पत्नीच्या हातांची बोटे कापली | In angry husband cuts off fingers of his wife nashik crime news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

Nashik Crime News : रागाच्या भरात पत्नीच्या हातांची बोटे कापली

Nashik Crime News : किरकोळ भांडणाच्या कारणावरून पतीने रागाच्या भरात पत्नीचे हाताचे आठ बोटे कापली. (Nashik News) या घटनेनंतर पतीने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील सोनज येथे घडली आहे. (In angry husband cuts off fingers of his wife nashik crime news)

सोनज येथील पारधी समाजाचे शिलाबाई (वय ३२) व बुधा जगन्नाथ शिसव (३७) हे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होते. १० एप्रिलला रात्री किरकोळ कारणावरून शिसव दाम्पत्यात वाद झाला. पती बुधा याने रागाच्या भरात पत्नी शिलाबाईवर विळा उगारला.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

बचावासाठी त्यांनी दोघे हात पुढे करत विळा हातांनी घट्ट पकडून ठेवला. रागात असलेल्या बुधाने विळा जोरात ओढताच शिलाबाईच्या दोघा हातांची आठ बोटे कापली गेली. परिसरातील समाजबांधवांनी जखमी शिलाबाईला तातडीने येथील रुग्णालयात दाखल केले.

या प्रकाराने बुधा घाबरला. या गोष्टीचा पश्‍चात्ताप झाल्याने त्याने १२ एप्रिलला राहत्या घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली

टॅग्स :Nashikcrime