देवपूरपाडेचा जलजीवन मिशन योजनेत समावेश

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal

देवळा (जि. नाशिक) : देवपूरपाडे (ता. देवळा) येथील पिण्याच्या पाण्याचा (Drinking Water) प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत (Jal jeevan mission) नवीन पाणीपुरवठा (water supply) योजनेसाठी एक कोटी ७३ लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अजय आहिरे यांनी सोमवार (ता.२०) दिली. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या प्रयत्नांतून देवपूरपाडे गावाचा समावेश जलजीवन मिशन योजनेत झाल्याने हा निधी मंजूर झाला आहे. लवकरच या कामाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामास प्रारंभ होणार आहे. (Inclusion of Devpurpade in Jaljivan Mission Plan nashik news)

Jal Jeevan Mission
वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून घंटागाडी कर्मचाऱ्याने घेतला गळफास

देवपूरपाडे गावाजवळील धरणाच्या कडेला विहीर खोदून तेथून पाइपलाइनने गावातील टाकीत पाणी टाकत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी पुरविण्याचे नियोजन आहे. रणादेवपाडे या वस्तीसाठीही याच योजनेतून स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. या योजनेंतर्गत देवपूरपाडे गावात नवीन पाण्याची टाकी बांधत तेथून पाण्याचे समप्रमाणात वितरण होणार आहे. या कामासाठी सोसायटीचे माजी चेअरमन तथा माजी सरपंच अभिमन आहिरे यांचे मार्गदर्शन असून, सरपंच अनिता सोनवणे, उपसरपंच शिवाजी आहिरे, सदस्य ज्योती आहिरे, सविता आहिरे, बाळासाहेब सावंत, जिभाऊ सोनवणे, अनिता जोंधळे, मनीषा कुवर यांचे सहकार्य लाभत आहे. ग्रामपंचायत सदस्य अजय आहिरे यांनी पाठपुरावा करत भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या प्रयत्नातून या पाणीपुरवठा योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे.

Jal Jeevan Mission
Nashik : प्रॉपर्टी वादातून माथेफिरु मुलाने आई वडीलांना पाठविले यमसदनी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com