esakal | कोरोनानंतर नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांमध्ये वाढ; नागरिकांकडून विविध उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनानंतर नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

कोरोनानंतर नाशिकमध्ये डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोना (coronavirus) काळात नागरिकांनी मास्कचा वापर वाढल्यामुळे साथीच्या इतर आजारांमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, स्वच्छतेचे प्रमाणही वाढले असल्याचे चित्र आहे. शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली नसली तरी डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नाशिक शहरात मागच्या वर्षाच्या जून महिन्याच्या तुलनेत या जूनमध्ये साथीच्या आजारांचे प्रमाण कमी होते. कोरोनामुळे नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे, तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. योगा, ध्यान करण्याचे प्रमाण वाढले असून, नागरिकांना घरून काम करता आल्याने मानसिक ताण कमी झाल्याचे दिसत आहे. (Increase-in-dengue-chikungunya-patients-nashik-marathi-news)

प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नागरिकांकडून विविध उपाय

पावसाळा अनेक आजारांना घेऊन येत असल्याने अडचणींमध्ये मोठी वाढ होते. बऱ्याच भागात पाणी साचलल्याने त्या ठिकाणी डेंगी, चिकूनगुनियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळी वातावरणात ताप, सर्दी, डोकेदुखी आणि खोकल्यासह इतर आजारांची लागण होण्याचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती वाढली असून, बाहेरचे खाणे टाळले जात असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी नागरिक विविध उपाय करताना दिसत आहेत.

रोजचे पाच-सहा रुग्ण

कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी डेंगी, चिकूनगुनिया रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. रोजचे पाच-सहा रुग्ण रोज वाढत आहेत. सर्दी, खोकला, डोकेदुखी, फ्लूसदृश आदी आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. मास्कच्या वापरासह बाहेरचे खाणे टाळले जात असल्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. डायरियाचे रुग्णही कमी असून, साथीच्या आजारांचे प्रमाण कमी झाले आहे. -डॉ. अतुल अहिरराव

-

तेलकट अन्न टाळा

कोरोनामुळे बाहेरचे खाणे टाळले जात असले तरी घरच्या जेवणानेही अपचन होण्याची समस्या उद्‍भवत आहे. उच्च आर्द्रता असताना शरीराची पचनशक्ती कमकुवत होते. त्यामुळे बाहेर तसेच घरात शिजविलेले तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

हेही वाचा: वय नसले तरी लग्न लावून द्या! अल्पवयीन मुला-मुलीची लगीनघाई

loading image