Nashik News : संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

Nashik News : संसर्गजन्य आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ

खामखेडा (जि. नाशिक) : मागील महिन्यापासून वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे खोकला, सर्दी, ताप या संसर्गजन्य आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. (Increase in Infectious Disease Patients Nashik News)

या आजारांबरोबर मळमळ, घसादुखी, अंगदुखी, अतिसार ही या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांनी दवाखाने गर्दीने भरत आहे. हवामानातील बदल तसेच इतर कारणांनी सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढू लागली आहेत. रुग्णांना ताप येणे. ताप गेल्यानंतर खोकला येत असल्याची परिस्थिती ग्रामीण भागात आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यतः हवेतून होत आहे. १५ पेक्षा कमी आणि ५० हून अधिक वयाच्या रुग्णांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत असल्याचे चित्र आहे. अनेक रुग्णात विषाणूचा संसर्ग श्वासनलिकेच्या वरील भागाला होत असून ताप येतो, अशा पद्धतीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सध्या दाखल होत आहेत.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

त्यामुळे या काळात गर्दीत जाणे टाळावे, हस्तांदोलन करू नये, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, स्वतःहून औषधे घेऊ नये अशी काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांकडून केले जात आहे.

"हात नियमितपणे साबण आणि पाण्याने धुवावेत. मास्कचा वापर करावा, गर्दीची ठिकाणी टाळावीत. नाक आणि तोंडाला हात लावणे टाळावे. खोकताना, शिंकताना नाक आणि तोंड व्यवस्थित झाकावे. पाणी पीत राहावे, भरपूर द्रवपदार्थांचे सेवन करावे." -डॉ. संजय निकम, देवळा.

टॅग्स :NashikHospital