नाशिक-कसबे वणी रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा!

nashik vani road
nashik vani roadesakal

दिंडोरी (जि. नाशिक) : तालुक्यातील नाशिक ते दिंडोरी रस्त्यावरील कसबे वणी रस्ता जीवघेणा बनला आहे. रस्त्यावर थोडा जरी पाऊस पडला तरी, मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या रस्त्याची संबंधित विभागाकडून पाहाणी करावी व जनतेच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी जनतेने केली आहे. (Increase in number of accidents on Nashik-Kasbe Wani road)

रस्ता चोपडा होऊन चारचाकी बाजूला सरकतात

तालुक्यातील आक्राळे फाटा ते लखमापूर फाटा या परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ज्या दिवशी थोडा पाऊस पडला की, अपघाताची नोंद निश्चित होत असते. याला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न जनतेला पडला आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्याची बांधणी करताना दोन्ही बाजूला उतार देण्याऐवजी एका बाजूला जास्त उतार आहे. पावसाने टायर चोपडे असलेल्या गाड्या रस्ता सोडून बाजूला जातात. त्यामुळे अपघात होत आहेत. या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम ठिकठिकाणी सुरू असून, ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाशिक ते वणी कसबे हे अंतर ४५ किलोमीटर असून, कोलवण नदीपासून वरखेड फाटा वळणाचा रस्ता असून रस्त्याचा उतार एकाच बाजूला आहे. समोरून आलेले वाहन दिसत नाही. अक्राळे फाटा ते लखमापूर फाटादरम्यान रस्त्याचा उतार एकाच बाजूला असल्याने थोडा पाऊस पडला की, रस्ता चोपडा होऊन चारचाकी बाजूला सरकवून जातात. त्यामुळे अपघात होतात असे नागरिकांचे म्हणणे आहे.

nashik vani road
माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

गतिरोधकामुळे अपघात वाढले

या रस्त्यावर पूर्वीचे गतिरोधक असल्याने अपघात होत असताना पुन्हा नव्याने गतिरोधक टाकल्याने आणखी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गतिरोधकांमुळे वाहने या ठिकाणी आदळून अपघातात भर पडत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकारी, ठेकेदारांत प्रथम समन्वय घडवून, डोळे उघडे ठेवून, जनतेच्या हितासाठी एकत्र यावे. रस्त्याबाबत चांगले निर्णय घेण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

(Increase in number of accidents on Nashik-Kasbe Wani road)

nashik vani road
देशातील अत्याधुनिक नवशहर सिडको उभारणार पांजरपोळ जागेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com