...अन् पेट्रोल भरून लोक पळून जातात

interesting Board
interesting Boardesakal

इंदिरानगर (जि. नाशिक) : राणे नगर भागातील एका पेट्रोलपंपावर (petrol pump) काही ग्राहक पेट्रोल भरून पैसे न देताच पळून जात असल्याने नाहक भुर्दंड बसण्याच्या धास्तीने येथील पंपांवर कर्मचाऱ्यांनी पैसे अगोदर देण्याची लावलेली सूचना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. (indira nagar petrol pump made new trick for customers Nashik News)

interesting Board
Nashik : बॉलिवूडच्या 'मॉडर्न गर्ल'वर गाणे विकण्याची वेळ

या पंपावर नेहमीच गर्दी असते. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वेळा चालक पेट्रोल भरल्यानंतर मागच्या वाहनाला जागा मिळावी म्हणून दुचाकी पुढे घेतात. त्यातील काही महाभाग कर्मचारी मागील वाहनात पेट्रोल टाकत आहे असे बघून पैसे न देताच सुसाट वेगाने निघून जातात. त्यामुळे नाहक या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेक वेळा अशी घटना घडल्याने येथील युनिटवर काही वाहनचालक पेट्रोल भरून पैसे न देताच पळून जाताहेत, पंपावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. कृपया अगोदर पैसे देणे, अशी सूचनाच लावत अगोदर पैसे मग पेट्रोल अशी पद्धत सुरू केली आहे. असे असले तरी सर्वसामान्य ग्राहकांची मात्र ही सूचना वाचून चांगलीच करमणूक होत आहे.

interesting Board
नाशिक : बिटको रुग्णालयाचे लवकरच होणार लोकार्पण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com