Nashik News : कुशीनगर एक्सप्रेसच्या बोगीत स्फोट; एक प्रवासी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

Nashik News : कुशीनगर एक्सप्रेसच्या बोगीत स्फोट; एक प्रवासी जखमी

मनमाड (जि. नाशिक) : लोकमान्य टिळक टर्मिनसहून गोरखपूरकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेस मधील जनरल डब्यात अचानक ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाला. (inflammable substance exploded in general compartment of Kushinagar Express nashik news)

या स्फोटात एक प्रवासी जखमी झाला. ज्या प्रवाशाच्या बॅगेतून हा स्फोट झाला त्या प्रवाशाचा शोध रेल्वे पोलिस प्रशासनातर्फे घेतला जात आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस होऊन निघालेल्या गोरखपूरला जाणारी कुशीनगर एक्स्प्रेसने मनमाड रेल्वे स्थानक सोडल्यानंतर पिंपरखेड - न्यायडोंगरी स्थानक दरम्यान गाडीतील जनरल बोगीत एका प्रवाशाच्या बॅगेत ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाला.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

यानंतर तत्काळ चेन ओढत गाडी थांबविण्यात आली. प्रवासी व रेल्वे प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बॅगला लागलेली आग आटोक्यात आणली. दरम्यान या घटनेमध्ये एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. ज्या बॅगेत स्फोट झाला त्या प्रवाशाचा शोध घेतला जात आहे. रेल्वे गाडीत ज्वलनशील वस्तू हाताळण्याची परवानगी नसताना स्फोट झाला कसा ? हा प्रश्‍न सर्वांना पडला.