Nashik : शिक्षणशास्‍त्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ

Admission News
Admission Newsesakal

नाशिक : शिक्षणशास्‍त्र विद्याशाखेतील वेगवेगळ्या पदवी, पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता राबविल्‍या जात असलेल्‍या विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या पात्रतेनुसार अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज करता येणार आहे.

राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे कॅप राउंडच्‍या संभाव्‍य तारखांची घोषणा केलेली आहे. त्‍यानुसार अभ्यासक्रमनिहाय विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरून कॅप राउंडसाठी ऑप्‍शन फॉर्म भरावा लागणार आहे. सद्यःस्‍थितीत दोन कॅप राउंडचे वेळापत्रक जाहीर केलेले आहे. प्रत्‍येक राउंडला विद्यार्थ्यांना ऑप्‍शन फॉर्म भरावा लागणार आहे. तसेच प्रारूप गुणवत्ता यादी प्रसिद्ध करत त्‍यावर हरकत, तक्रारी मागविण्यात येतील. (Initiation of Education Course Admission Process Nashik Latest Marathi News)

Admission News
PFIच्या मालेगातील आणखी 2 कार्यकर्त्यांना अटक

अंतिम यादी जाहीर करत त्‍यानंतर संबंधित राउंडसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्‍यान नोंदणीसोबत विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत. कागदपत्रांची पडताळणी स्‍क्रुटीनी पद्धतीतून करून घ्यावी लागणार आहे. इयत्ता बारावी, पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या पात्रतेनुसार अभ्यासक्रमांना प्रवेश अर्ज भरता येणार आहे. एम.एड.या पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी बी.एड. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्‍ध असेल.

पहिल्‍या कॅप राउंडकरीता नोंदणी,

ऑप्‍शन फॉर्म भरण्याची मुदत अशी-
- बीए/बी.एस्सी-बी.एड. ------ २६ सप्‍टेंबर ते ५ ऑक्‍टोबर
- बी.एड. -----------------------३० सप्‍टेंबर ते १२ ऑक्‍टोबर
- बी.पीएड.---------------------२७ सप्‍टेंबर ते ५ ऑक्‍टोबर
- एम.एड.----------------------२८ सप्‍टेंबर ते ६ ऑक्‍टोबर

Admission News
दसऱ्याच्या दिवशी गांधीनगरला 53 फुटी रावण दहन; यंदाचे 67 वे वर्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com