Nashik News : 5 रुपयाची पतंग पडली बेतली जिवावर; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akib bagwan

Nashik News : 5 रुपयाची पतंग पडली बेतली जिवावर; जखमी मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

जुने नाशिक : कटलेल्या पतंगामागे पळत असताना रस्त्यावर पडून जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवार (ता. १८) दुपारी उघडकीस आली. अकीब रफिक बागवान (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. (Injured child during kite dies during treatment Nashik News)

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Satara Crime News: माध्यमांवर प्रसिध्दी मिळावी म्हणून दुचाकींची चोरी; शिरवळमध्ये टोळी जेरबंद

भारतनगर येथील अकीब बागवान मंगळवारी (ता. १७) सायंकाळी कटलेल्या पतंगाच्या मागे धावत होता. त्यास दम लागल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांनी उपचारार्थ त्यास खासगी रुग्णालयात दाखल केले.

उपचार सुरू असताना बुधवारी (ता.१८) त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली. पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : सातपूरमध्ये 30 वर्षीय तरुणाचा खून