नाशिक : जखमी अवस्थेत सोडलेल्या घोडा बनला जीवनाचा आधार

Farmer with Horse
Farmer with Horseesa

साल्हेर (जि. नाशिक) : काळजी घेतली तर मुकी जनावरेही मनुष्याला जीवनभर साथ देतात. असेच एक उदाहरण बागलाण तालुक्यात पाहायला मिळत आहे. जखमी अवस्थेत सोडलेला घोडाच (Horse) जीवनाचा आधार बनला असून, परिसरात हा चर्चेचा विषय ठरला आहे. (injured condition horse became the basis of life for farmer Nashik News)

बागलाण तालुक्यातील आदिवासी (Tribal Community) पश्‍चिम पट्ट्यातील मानूर ग्रामपंचायत अंतर्गत मोराळागडी पाडा भागात दोन वर्षापूर्वी मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी आले होते. मेंढ्यांसोबत एक घोडा सोबत होता. त्या घोड्याला पाठीमध्ये मार लागल्याने तो पूर्ण जखमी अवस्थेत होता. तेव्हा मेंढपाळाने जखमी अवस्थेतील घोड्यावर बरेच उपचार केले. मात्र, घोडा उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. तो चालूही शकत नव्हता. अशा स्थितीत घोड्याला पुढील प्रवासाला कसे घेऊन जावे, असा प्रश्‍न पडला. त्याचवेळी त्यांनी या घोड्याला मोराळागडी पाडा येथील आदिवासी शेतकरी पंडित अहिरे यांच्याकडे सुपूर्द करून पुढील प्रवासाला निघून गेले. परंतु, भुतदया अंगी असलेल्या पंडित अहिरे यांनी जखमी घोड्यावर जडीबुटीसह पारंपारित उपचार केले. घोड्याची दररोज मालिश करून घोडा पूर्णपणे बरा केला. विशेष म्हणजे याच घोड्यावर स्वार होत पंडित आहिरे दुरवरचा प्रवास करतात.

मानूर परिसरात सध्या लग्नसराईचा धडाका असल्याने या भागात नवरदेवाची मिरवणूक काढण्यासाठी पंडित अहिरे यांच्या घोड्याला दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. घोड्याला रोजचा खुराक म्हणून वाटाणा, मैसूर गव्हाचे कनिक दिला जातो. तसेच, घोड्याला चारण्यासाठी शेतात सोडले जाते. घोड्यामुळे दुचाकीचा वापर बंद असून, इंधन बचतही होत आहे.

Farmer with Horse
सत्यशोधक विवाह चर्चेत; मामांकडून भाचीसाठी अनोखे कन्यादान

जखमी अवस्थेत असलेला घोडा पूर्ण बरा केला आहे. हा घोडा मला आज उपयोगी पडत आहे. गावाहून शेतात जाण्या- येण्यासाठी, बाजारपेठेच्या गावात जाण्यासाठी मोठी मदत मिळते. लग्नसराईत दोन पैसेही कमवून देत आहे. त्यामुळे जखमी अवस्थेत मिळालेला घोडा आज माझा जीव की प्राण झाला आहे. - पंडित अहिरे, आदिवासी शेतकरी, मोराळागडी पाडा

"वाढत्या महागाईमुळे सर्वसाधारण जीवन जगणे मुश्किल झाले. त्यातच पेट्रोल दरवाढीमुळे सर्वसाधारण शेतकरी दुचाकी वापरू शकत नाही, अशी सध्याची स्थिती असताना त्यातून पंडित अहिरे यांना मार्ग सापडल्याने घोड्यावरील प्रवास आर्थिक व शारीरिकदृष्ट्या फायदेशीर आहे."
- मधुकर भोये, कृषी सेवा केंद्र, साल्हेर

Farmer with Horse
Nashik : आता सेन्सरद्वारे शोधा चाळीतील खराब कांदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com