esakal | चालताबोलता श्वास गुदमरून मृत्यूंची होणार चौकशी; पोलिस आयुक्तांनी मागविली माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

death

चालताबोलता श्वास गुदमरून मृत्यूंची होणार चौकशी; पोलिस आयुक्तांनी मागविली माहिती

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्यापासून रस्त्यावर चालताना किंवा घरात बोलता बोलता अचानक श्वासाच्या त्रासामुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी माहिती मागविली आहे. कोरोनाशी साधर्म्य असलेला हा मृत्यू असून, श्वास घ्यायला त्रास होऊन रोज किमान तीन ते चार मृत्यू होत आहेत. मात्र, यंदा ही संख्या सात ते आठपर्यंत पोचली आहे. कोरोना मृत्यूशी मिळतीजुळती लक्षण दिसणाऱ्या मात्र कोरोना म्हणून कुठेही नोंद न होणाऱ्या या मृत्यूंची चौकशी होऊन त्यावर उपायही शोधला जाणार आहे.

वर्षभरापासून हा प्रकार सुरू आहे. मात्र गेल्या वेळी पहिल्या लाटेत कोरोनाविषयी यंत्रणा, शासन-प्रशासन सगळेच संभ्रमित असल्याने मृत्यूंची चर्चा झाली नाही. मात्र यंदा उन्हाळ्यात पुन्हा श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून लोकांचे मृत्यू सुरू आहेत. दिवसाला सहा ते सात मृत्यू हे श्वास घेता न आल्याने होत आहेत. कोरोनासदृश आजारामुळे मृत्यू होत असले तरी, या महिन्यात पुन्हा एकदा या मृत्यूंची संख्या वाढल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी यात लक्ष घालून जिल्हा रुग्णालयाकडून माहिती मागविली आहे.

हेही वाचा: विवाह मुहूर्त टळले, तर वर्ष वाया जाणार... !

नैसर्गिक मृत्यूत गणना

शहरात रस्त्याने चालताना, फिरताना, गप्पा मारताना श्वास घेण्यास त्रास होऊन लोकांचे मृत्यू सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून हे प्रकार जास्त वाढले. गेल्या वर्षी नाशिक रोडला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सर्वप्रथम असा प्रकार उघडकीस आला होता. ‘सकाळ’ने याविषयी बातम्याही प्रसिद्ध केल्या. मात्र तब्बल आठ ते नऊ महिने केवळ

अशा मृत्यूंच्या कारणांचा शोध

श्वास घेण्यास त्रास म्हणून अकस्मात मृत्यू म्हणूनच हे मृत्यू नोंदले जात आहेत. ही संख्या आता शेकडोच्या जवळ चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आणि तीच लक्षणं दिसत असल्याने या अकस्मात मृत्यूंचा कोरोनाच्या साथीशी काही संबंध आहे का, याचा तपास घेतला गेला नाही. पण यंदा प्रशासनाकडून अशा मृत्यूंच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे.

शहरात दीडशेवर मृत्यू?

मात्र आता पूर्वी आठवड्याला तीन ते चार असलेली संख्या आता दिवसाला दोन ते तीन या प्रमाणात वाढल्याने तीन महिन्यांत ही संख्या वाढली आहे. फक्त जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची संख्या दीडशेच्या आसपास आहे. साधारण ज्येष्ठच मोठ्या संख्येने बळी पडत असल्याने घरीच मृत्यू झालेला मृत्यू नैसर्गिक मृत्यू म्हणून दुर्लक्ष होते. मात्र आता पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी स्वतः यात लक्ष घालून कोरोना मृत्यूशी साधर्म्यी मृत्यूबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून माहिती मागविली आहे.