नाशिक : धोकेदायक वाडे पाडणार; वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना | Latest marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC Latest marathi news

नाशिक : धोकेदायक वाडे पाडणार; वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना

नाशिक : शहरातील धोकादायक असलेल्या वाड्यांच्या (dangerous wada) मालक व भाडेकरूंना नोटीस देऊनही घराबाहेर पडत नाही. त्यात वाडे ढासळण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने महापालिकेची (NMC) डोकेदुखी वाढली आहे.

त्या पार्श्वभूमीवर तिसरी व अंतिम नोटीस बजावताना वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (Instructions for disconnection of electricity water supply of dangerous wada by nmc Nashik News)

शहरात धोकादायक वाड्यांची संख्या वाढत आहे. एकूण एक हजार ७७ धोकादायक वाड्यांची नोंदणी झाली आहे. पश्चिम विभागामध्ये सहाशे, सातपूर विभागात ६८, पूर्व विभागात ११७, सिडको विभागात २५, पंचवटी विभागात १९८ तर नाशिक रोड विभागात ६९ धोकादायक वाड्यांची नोंद झाली आहे.

विशेष म्हणजे सर्व वाडे गावठाण भागात आहे. दरवर्षी पावसाळा येण्यापूर्वी विभागीय कार्यालयामार्फत धोकादायक वाड्यांना नोटिसा दिल्या जातात. पावसाळा झाल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर जैसे थे वातावरण निर्मिती होते.

दरवर्षी धोकादायक वाड्यांना नोटिसा देण्याचा सोपस्कार पार पाडला जातो. महापालिकेचे अधिकारी नोटीस देताना कायदेशीर अडचणीतून सुटका करून घेत असल्याचा अनुभव आहे. मात्र, घटना घडल्यानंतर वाड्यात राहणाऱ्या नागरिकांचा नाहक जीव जातो. या वर्षीदेखील पाच वाडे ढासळण्याचा प्रकार घडला आहे.

वाडे पडण्याचे संकट महापालिका व संबंधित नागरिकांनादेखील परवडणारे नाही. त्याचप्रमाणे वर्षानुवर्षापासून वास्तव्यास असल्याने वाड्यातील मालकी हक्क जाऊ नये अशी भावना भाडेकरूंची आहे.

या संपूर्ण परिस्थितीचा विचार करून महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी धोकादायक वाड्यांमध्ये राहत असलेल्या भाडेकरूंच्या जागेचे मोजमाप करण्याबरोबरच त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या आहे. जे भाडेकरू सुरक्षित स्थळी हलणार नाही. त्यांचे वीज व पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा: Latest Marathi News : सिलिंडरच्‍या डिलिव्‍हरीचा ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

पोलिसांची मदत घेणार

धोकादायक वाडे रिकामे खाली करण्याबरोबरच ते जमीनदोस्त करण्याच्या सूचना यापूर्वी देण्यात आल्या आहे. त्यानुसार वाडे पाडले गेले नसेल, तर उच्च न्यायालयातील याचिका क्रमांक ११३५ च्या आधारे नोटिसा बजावण्याच्या सूचना दिल्या. वाडे खाली करण्याबरोबर जमीनदोस्त करण्यासाठी पोलिस विभाग व महावितरण विभागाची मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: Latest Marathi News : सांडपाण्यातच संसार थाटण्याची वेळ; गटारीचे पाणी घरात

Web Title: Instructions For Disconnection Of Electricity Water Supply Of Dangerous Wada By Nmc Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..