NMC News : अनधिकृत बॅनर उभारणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना | Instructions to file criminal charges against unauthorized banner erectors NMC nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NMC commissioner Dr Chandrakant Phulkundwar  latest marathi news

NMC News : अनधिकृत बॅनर उभारणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना

Nashik News : स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिकला वरचा क्रमांक मिळण्यासाठी प्रयत्न होत असताना दुसरीकडे मात्र शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत फलक वाढल्याने त्या पार्श्वभूमीवर आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांनी अनधिकृत फलक बॅनर उभारणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कारवाईचा अहवाल सादर करावा अन्यथा अनधिकृत बॅनरबाजीला जबाबदार धरण्याच्या सूचना विभागीय अधिकाऱ्यांना दिल्या. (Instructions to file criminal charges against unauthorized banner erectors NMC nashik news)

शहरात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी होत आहे. त्यात राजकीय पक्षाचा मोठा सहभाग आहे. महापुरुषांच्या जयंतीचे कार्यक्रम वगळता राजकीय पक्षाकडून मेळावे व अन्य कार्यक्रमांची बॅनरबाजी होत आहे.

त्याचबरोबर नेत्यांचे आभार मानणारे फलक झळकले जात आहे. राजकीय शेरेबाजीदेखील पोस्टरच्या माध्यमातून होत असल्याने या माध्यमातून शहराला बकालपणा येत आहे. त्यामुळे आयुक्तांनी कठोर भूमिका घेत शहरातील कुठल्याही भागात अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पोस्टर, झेंडे लावले जाणार नाही.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या. अधिकाऱ्यांनी विभागांमध्ये फिरून अनधिकृत बॅनरबाजी आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्याच्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अतिक्रमण निर्माण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांच्याकडे सोपविण्यात आली.

सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा अहवाल लेखी स्वरूपात आयुक्तांकडे सादर करावा, अशा सूचना दिल्या. त्याचबरोबर अनधिकृत होर्डिंगबाजी संदर्भात मालकी हक्क व इतर आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्याच्या सूचनादेखील दिल्या आहेत. कारवाई करताना संबंधितांशी असभ्यपणे बोलू नये याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.