Rangpanchami Festival : रंगपंचमीनिमित्त सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CCTV

Rangpanchami Festival : रंगपंचमीनिमित्त सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना

जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यात रंगपंचमीनिमित्त पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत चारही पोलिस ठाण्याची बैठक झाली. रंगोत्सव आयोजकांकडून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना करण्यात आल्या.

पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येणार आहे. त्यात गैरकृत्य आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले. (Instructions to install CCTV on Rangpanchami Festival nashik news)

बैठकीस वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, डॉ. सीताराम कोल्हे, श्री. अहिरे, निरीक्षक दिलीप ठाकूर आदी उपस्थित होते. सर्वांनी उत्साहात, शांततेत रंगपंचमी साजरी करावी, अशा सूचना श्री. चव्हाण यांनी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.

रंगोत्सवाचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी स्वतःचे स्वयंसेवक नियुक्त करावे. रंगोत्सवच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावावे. फुग्यामध्ये पाणी अथवा रंग घालून त्याचा वापर करू नये. असे करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

तसेच, केवळ पारंपारिक वाद्यांचा वापर करावा. डीजे आढळून आल्यास डीजे जप्त करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट लहान मुलांकडून रंग खेळताना मोठ्या प्रमाणावर फुग्यांचा वापर केला जातो.

त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. असे होऊ नये यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष ठेवावे. या वेळी विनायक पांडे, राजेंद्र बागूल, नंदू कहार, चेतन वावरे, हरी आंबेकर, अमित शिर्के, नीलेश भालेराव, अतुल जाधव, विकी लोणारी, मनोज लोणारी, मयूर कुंवर, सर्वेश पोळ आदी उपस्थित होते.