शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल परीक्षा परिषद संकेतस्थळावर घोषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल परीक्षा परिषद संकेतस्थळावर घोषित

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल परीक्षा परिषद संकेतस्थळावर घोषित

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे १२ ऑगस्टला घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल आज दुपारी अडीचला परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाला. www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल लॉगींनमधून आणि पालकांना पाल्याचा निकाल पाहता येणार आहे.

हेही वाचा: राहुरी : एकरकमी भरा अर्धेच वीजबिल; प्राजक्त तनपुरे

विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये आजपासून ५ डिसेंबर २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध असेल. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरसाठी पन्नास रुपये शुल्क ऑनलाइन भरणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडील-आईचे नाव, शहरी अथवा ग्रामीण अभ्यासक्रम यामध्ये दुरुस्तीसाठी ५ डिसेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाइन अर्ज उपलब्ध असेल. अर्ज ऑनलाइन व्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. गुणपडताळणीचा निर्णय अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांमध्ये कळवण्यात येईल. ऑनलाइन गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल, असे परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी सांगितले.

loading image
go to top