
Nashik Crime News: खंबाळे येथील खुनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग
Nashik Crime News : खंबाळे (ता.इगतपुरी) येथील विवाहित महिलेवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या संशयित आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या स्वाधीन करण्यात येऊन पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. (Investigation of murder in Khambale handed over to local crime branch Nashik Crime News)
अत्याचार ग्रस्त महिलेला न्याय मिळावा, या हेतूने मोठा जमाव रविवार पोलिस ठाण्यात जमला होता. यामध्ये काही समाजकंटकांनी जमावास चिथावणी देण्याचा प्रयत्न केला होता. या बाबत पोलिसांकडे सर्व माहिती, फोटो व व्हिडिओ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेच्या रात्रीपासून ते सोमवार सायंकाळपर्यंत अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, विभागीय अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्यासह शिघ्रकृती दलाचे जवान उपस्थित होते. कोणत्याही परिस्थिती संशयित आरोपी सुटणार नाही यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने संशयित आरोपी याचा कबुली जबाब घेत गुन्हा दाखल केला आहे.
नागरिकांचा रोष स्वत: ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पहिल्याने सदर गुन्हा हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करत संशयित आरोपी ताब्यात देण्यात आला आहे.