Nashik Crime News : शेअर्स बाजारातील गुंतवणूक अंगलट; आमिष दाखवून सव्वा कोटींचा गंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Nashik Crime News : शेअर्स बाजारातील गुंतवणूक अंगलट; आमिष दाखवून सव्वा कोटींचा गंडा

नाशिक : शेअर बाजारमधील आर्थिक गुंतवणुकीवर चार टक्क्याने दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्यांनी एक कोटी ३८ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संघटित गुन्हेगारीसह फसवणुकीचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलिसात दाखल करण्यात आला आहे. (Investments in stock market gone wrong scam of one crore by showing bait Nashik Crime News)

युवराज बाळकृष्ण पाटील (४०, रा. माठ गल्ली, बेळगाव, कर्नाटक), राहुल शंकर गौडा पाटील (३५, बसवन नगर, बेळगाव, कर्नाटक) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

संजय सदानंद बिन्नर (रा. भगूर, देवळाली कॅम्प) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित दोघांनी गेल्या मार्च ते ऑगस्ट २०२० या कालावधीत शेअर मार्केटमधील त्यांचे ॲक्युमेन व गुडविल या कंपन्यांचे प्रमाणपत्र बिन्नर यांना दाखविले आणि आपण या कंपन्यांमधील ब्रोकर असल्याचे बिन्नर यांच्यासह काही गुंतवणूकदारांना भासविले.

हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?

कंपन्यांच्या शेअर्समध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास दरमहा निश्चित ४ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दोघा भामट्यांनी गुंतवणूकदारांना दिले. त्यामुळे दोघांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संजय बिन्नर यांच्यासह इतरांनी एक कोटी ३८ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली.

मात्र संशयितांनी पैसे मिळाल्यानंतर परतावा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बिन्नर यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, दोघांविरोधात फसवणुकीसह संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहर गुन्हेशाखेचे सहायक निरीक्षक प्रकाश गीते तपास करीत आहेत.