NMC News : धोकादायक वाडा पडल्यास आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation News

NMC News : धोकादायक वाडा पडल्यास आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

नाशिक : मालक (Owners) किंवा भाडेकरूंनी धोकादायक वाडे स्वत:हून न उतरविल्यास पोलिस बंदोबस्त लावून मिळकती उतरविण्याबरोबरच त्याचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्याचा

निर्णय घेण्यात आला आहे. (It has decided by Municipal Commissioner to file case of Crime of culpable homicide against owners if dangerous mansion falls nashik news)

आता त्याचबरोबर आता धोकादायक वाडा पडल्यास मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये एक हजार ७७ धोकादायक घरे, वाड्यांची नोंद करण्यात आली आहे. या मध्य पश्चिम विभागात सर्वाधिक धोकादायक वाडे व घरे आहेत. पश्चिम विभागात सहाशे, सातपूर विभागात ६८, पूर्व विभागात ११७, सिडको विभागात २५,

पंचवटी विभागात १९८ तर नाशिकरोड विभागात ६९ या प्रमाणे धोकादायक वाडे व इमारतींचे वर्गीकरण आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक मिळकतींना नोटीस बजावल्या जातात. परंतु, कायदेशीर अडचण निर्माण झाल्यास त्यातून सुटका करून घेण्यासाठी नोटिसांचा सोपस्कार पार पाडला जातो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मालक किंवा भाडेकरूंनी धोकादायक वाडे स्वत:हून न उतरविल्यास पोलिस बंदोबस्त लावून मिळकती उतरविण्याबरोबरच त्याचा खर्च संबंधितांकडून वसुल करण्याचा निर्णय घेताना धोकादायक वाडा पडल्यास मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.