नाशिक : शिक्षणात गुंतवणूक करणे आवश्यक : देशमुख

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विशेष राष्ट्रीय पुरस्कार नीलिमाताई पवार यांना प्रदान
nashik
nashiksakal

नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले(savitribai phule), महात्मा जोतिराव फुले यांचा वारसा आपण विसरलो असून, समाजासाठी हितकारी काय आहे, हे शिक्षण व्यवस्थेने दिले नाही. समाजात नैतिक संस्कार बिंबविण्यात शिक्षण कमी पडले आहे. शिक्षणातून माणसाचा पाया घडण्याचे काम होते. मविप्र संस्थेने शिक्षण व्यवस्थेत पाया म्हणून काम केले असून, शिक्षणात आता गुंतवणूक करणे आवश्यक आहे, असे विचार माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले. कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे १८ वा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विशेष राष्ट्रीय पुरस्कार नीलिमाताई पवार यांना, तर विशेष प्रेरणा पुरस्कार अनिता पगारे, नानाजी शिंदे (मरणोत्तर) यांना परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सोमवारी (ता. ३) प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

nashik
नाशिक महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी पेसो परवाना

लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, की आताच्या काळात विज्ञाननिष्ठा, सत्याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. समाज महापुरुषांना दैवत मानतो. मात्र, त्यांचे विचारांचे अनुसरण करत नाही. सावित्रींच्या लेकी आज समानतेचे जीवन जगत असून, समाज विवेकी असायला हवा. शिक्षण महाग झाले असून, ऑनलाइन शिक्षणात ग्रामीण भागातील फक्त ३० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत आहे. कोरोना काळातील आर्थिक नुकसान भरून काढता येईल. मात्र, विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून काढता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. वाचनालयाचे विश्वस्त राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. रविकांत शार्दुल यांनी सूत्रसंचालन केले. शिवानी कोठावदे यांनी आभार मानले.

nashik
नाशिकमध्ये पाणवेली अन्‌ पाणकणसांमुळे पक्ष्यांचे स्थलांतर

समाजकार्यासाठी पुरस्काराची रक्कम परत : पवार

मराठा विद्याप्रसारक संस्थेला मिळालेला पुरस्कार उंची वाढविणारी बाब आहे. सावित्रींच्या लेकी म्हणून सन्मानाने बसलो आहोत. लोकसहभागातून संस्थेचा पाया रचला गेला आहे. शासनाच्या बरोबरीने उभी राहणारी मविप्र संस्था आहे. समाज हा मोठा लोकशिक्षक आहे. त्यामुळे विशेष राष्ट्रीय पुरस्काराच्या २१ हजारांच्या रकमेत ११ हजार रुपये समाजकार्यासाठी मविप्र संस्था टाकत असल्याचे संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी नमूद करताना पुरस्काराची रक्कम परत केली.

nashik
पिण्याच्या पाण्यासाठी यांना करावा लागतोय जीवघेणा संघर्ष; पाहा व्हिडिओ

प्रेरणा पुरस्काराचे मानकरी

कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे फादर वेन्सी डिमेलो, व्ही. टी. जाधव, उमा दरोडे, राहत फाउंडेशनचे पदाधिकारी विजय भोये यांना प्रेरणा पुरस्कार माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

समाजाचे हित पाहिले : उत्तम कांबळे

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतिराव फुले यांच्यासारख्या व्यक्ती कमी होत असून, काट्यांची संख्या वाढत आहे. महिला अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीचे वाढत जाणारे वय, समाजाचा अंधार कमी करण्याचा प्रयत्न करत कर्तृत्वाच्या खुणा ज्या संस्थांनी उमटवल्या आहेत, त्या संस्थांना पुरस्कार देऊन समाजाचे हित पाहिले असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक व वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com