Jalgaon: एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ
एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ

जळगाव : एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली कुलदेवतेची शपथ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य शासनाने बैठक घेत पगारवाढीचा प्रस्‍ताव सादर केला आहे. परंतु, हा निर्णय मान्‍य नसल्‍याने एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप कायम ठेवला आहे. जळगाव विभागातही संप कायम असून कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे चोपडा आगारातील सर्व कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त करत कुलदेवता व परिवाराची शपथ घेत संप सुरूच ठेवला आहे.

राज्‍य सरकारने बुधवारी (ता. २४) झालेल्या बैठकीनंतर निर्णय जाहीर केला; त्या निर्णयावर एसटी कर्मचारी समाधानी नाहीत. राज्य शासनात विलीनीकरण झाल्याशिवाय संप मिटणार नसल्‍याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्‍यामुळे जळगाव विभागीय कार्यालयाच्‍या मध्‍यवर्ती बसस्‍थानकात देखील कर्मचारी आंदोलनात बसले आहेत. सलग १९ दिवसांपासून हा संप सुरू आहे. जिल्‍ह्यातून संप मागे नाहीच राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आजही कायम आहे.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

परिवहन मंत्री परब यांच्‍या पगारवाढीचा निर्णय कर्मचाऱ्यांना मान्‍य नसून विलीनीकरण हीच अंतिम मागणी आहे. या मागणीवर राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या जळगाव विभागातील सर्व पंधरा आगारातील कर्मचारी संपावर ठाम आहेत. शुक्रवारी दिवसभर सर्व आगारांमधील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जळगाव बसस्‍थानकात देखील दिवसभर कर्मचारी आंदोलन करत बसले होते.

चोपडा आगारात कुलदेवतेची शपथ जोपर्यंत शासनात विलीनीकरण होत नाही; तोपर्यंत कामावर जायचे नाही. तसेच संपावर ठाम राहण्याची भूमिका चोपडा आगारातील कर्मचाऱ्यांनी घेतली. इतकेच नाही तर संप कायम ठेवत सर्व कर्मचाऱ्यांनी कुलदेवतेची व सहपरिवाराची जबाबदारी म्‍हणून शपथ घेत आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचे ठरविले आहे.

loading image
go to top