esakal | वैतरणा धरणातील ६२३ हेक्टर अतिरिक्त जमीन मूळ मालकांना : जयंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

jayant patil

वैतरणा धरणातील ६२३ हेक्टर अतिरिक्त जमीन मूळ मालकांना : जयंत पाटील

sakal_logo
By
पोपट गवांदे

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात बांधण्यात आलेल्या अप्पर वैतरणा धरणासाठी संपादित जमिनीपैकी वापराविना पडून असलेली ६२३ हेक्टर अतिरिक्त जमीन स्थानिक मूळमालक असलेल्या व ज्या जमिनी शेतकरी स्वत: कसत आहेत. मात्र या जमिनी आजही शासनाकडे संपादित आहेत. त्या जमिनी शेतक-यांना परत मिळणार आहे. याबाबत गुरुवारी (ता. ८) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस जलसंपदामंत्री जयंत पाटील व जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते. (Jayant Patil orders to give 623 hectares of additional land in Vaitarna dam to the original owners)


इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणातील विनावापरा पडीत असलेल्या जमिनी मूळ मालकांना परत मिळावी यासाठी आमदार हिरामण खोसकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. विशेष म्हणजे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या बैठकीत महसुली विभागातील व जलसंपदा विभागातील महत्वाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देत येत्या दोन महिन्यात हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश दिलेत. बैठकीत प्रमुख्याने इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदार संघातील धरणांची स्थिती याबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीत जलसंपदामंत्री पाटील व श्री. आव्हाड यांनी वैतरणा धरणातील अतिरिक्त जमिनी शेतकऱ्यांना परत देण्यात याव्यात, अशा सूचना दिल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली.


वैतरणा धरणात संपादित झालेल्या जमिनिपैकी वापरात नसलेल्या आणि स्वता: शेतकरी कसत असलेल्या अतिरिक्त जमीनी मुळ मालकांना परत मिळाव्यात अशी अनेक वर्षापासून मागणी होती. अप्पर वैतरणा धरणाच्या कामासाठी अतिरिक्त जमीन एकूण ६२३ हेक्टर एकूण १५ गावे संपादन केलेली आहे. ही जमीन अद्यापही शासनाच्या नावावर आहे. मात्र ही जमीन स्थानिकांना देण्यात यावी, प्रकल्पग्रस्तांच्या उताऱ्यावर आजही शासनाचे नाव आहे ते काढून मुळ मालक असलेल्या प्रकल्पग्रस्तानचे नाव लावण्यात यावे, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत होती. मुळ मालक असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना स्वमालकीची जमिन पुन्हा त्यांच्या नावावर करण्यात येईल, अशी अशा आमदार खोसकर यांनी व्यक्त केली.

(Jayant Patil orders to give 623 hectares of additional land in Vaitarna dam to the original owners)

loading image