Nashik News : पानवेली काढल्याशिवाय वाळूउपसा नको; महसूलमंत्री विखे पाटील यांना घेराव घालत विचारला जाब | Khandu Bodke statement about Sand should not be pumped from Godavari river basin without removal nashik news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panveli stuck in godavari river

Nashik News : पानवेली काढल्याशिवाय वाळूउपसा नको; महसूलमंत्री विखे पाटील यांना घेराव घालत विचारला जाब

Nashik News : गोदावरी नदीपात्र पानवेलींनी व्यापले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने पानवेली काढण्यास दुर्लक्ष केल्याने करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी आज आक्रमक भूमिका घेत थेट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनाच शिवसैनिकांसह घेराव घातला. (Khandu Bodke statement about Sand should not be pumped from Godavari river basin without removal nashik news)

चांदोरीच्या वाळू डेपो उद्घाटन कार्यक्रमाप्रंसगी पानवेली काढल्याशिवाय गोदावरी नदीपात्रातील वाळू उपसा करू नये अन्यथा गोदाकाठच्या नागरिकांसमवेत तीव्र जनआंदोलन छेडन्याचा इशारा त्यांनी दिला. त्यावर पाटबंधारे विभागाला तत्काळ पानवेली काढण्याचे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

चांदोरी येथे जिल्हा प्रशासनातर्फे वाळू उपसा केंद्राचे उद्घाटन शनिवारी (ता.१३) महसूलमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले, आमदार दिलीप बनकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी विखे पाटील यांच्या भाषणानंतर खंडू बोडके यांनी थेट व्यासपीठाकडे धाव घेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पानवेली काढल्याशिवाय गोदावरी नदीपात्रातील वाळू उपसा करू नये अशी मागणी करत शिवसैनिकांसह घेराव घालत जाब विचारला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांच्या समवेत चांदोरीचे सरपंच विनायक खरात, उपसरपंच संदीप टरले, सदस्य आबा गडाख, प्रकाश ढेमसे, दौलत टरले, सचिन गडाख, संदीप जाधव, दिगंबर खालकर, सोमनाथ बस्ते, गणेश शिंदे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे यांना तत्काळ पानवेली काढण्याचे निर्देश दिले. पानवेली काढण्यासाठी २५ लाख रुपयांची तरतूद केल्याची माहिती जिल्हाधिकारी डी.गंगाथरण यांनी खंडू बोडके यांना दिली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने तातडीने दखल घेत संबधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ करंजगाव व सायखेडा पुलावर पानवेलींची पाहणी करण्यासाठी पाठवले.