Kharif Season Preparation: मालेगाव विभागात 17 हजार हेक्टर पेरणी; सर्वाधिक क्षेत्र मकाचे

Kharif Season Preparation
Kharif Season Preparationesakal

Kharif Season Preparation : कसमादे परिसरात खरीप हंगामाची तयारी सुरु झाली आहे. शेतकऱ्यांची खरीप मशागत अंतिम टप्प्यात आहे. विभागात पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शेतकऱ्यांसह कृषी विभाग खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे.

बियाणे, खतांची उपलब्धता, पेरणीचे नियोजन सुरु आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावेळी खरीप हंगामाचे पेरणीचे क्षेत्र अन्य पिके, शेडनेट व नावीन्यपूर्ण प्रयोगांमुळे पाच हजार हेक्टरने कमी होण्याची शक्यता आहे.

मालेगाव उपविभागातील बागलाण, नांदगाव व मालेगाव या तीन तालुक्यात दोन लाख १७ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावर संभाव्य खरीप पिकांची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र मका पिकाचे असेल. (Kharif Season Preparation Sowing 17 thousand hectares in Malegaon Division Most maize crop nashik news)

कसमादे परिसरात गेल्या दशकापासून मका व कांदा या पिकांवर शेतकऱ्यांचा जोर आहे. पाठोपाठ कापूस लागवडीचे क्षेत्र आहे. २०२३-२४ च्या हंगामात सुमारे १ लाख ७ हजार ५९० हेक्टर क्षेत्रावर मका पेरणीची शक्यता आहे.

यात सर्वाधिक क्षेत्र मालेगाव तालुक्यातील असेल. तालुक्यात ३४ हजार ९४० हेक्टर क्षेत्रावर मका पेरणीची शक्यता आहे. गेल्या दशकात बाजरीच्या क्षेत्रात काहीशी घट झाली आहे.

कांदा, मका, कापूस या नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून घर व कुटुंबाला आवश्‍यक हिशेबाने बाजरी पेरणी होत आहे. कसमादे परिसरात बागलाणचा ठराविक पट्टा वगळता भाताचे क्षेत्र अत्यल्प आहे. बागलाण तालुक्यात या हंगामात २ हजार ७०० हेक्टरवर भात लागवड अपेक्षित आहे.

कडधान्यात डाळींचे भाव वधारल्याने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर, मुग, उडीद, कुळीद आदींची लागवड गतवर्षीच्या तुलनेत काहीशी वाढणार आहे. तीन उपविभाग मिळून एकूण ११ हजार ६४९ हेक्टरवर कडधान्य लागवड अपेक्षित आहे.

तेलबियांच्या प्रमाणात सातत्याने घट होत आहे. भुईमुगाचे क्षेत्रही सातत्याने कमी होत असताना सोयाबीन लागवडीकडे काही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

यामुळे तीन तालुक्यात सुमारे ४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पीक पेरणीचे उद्दिष्ट आहे. २७ हजार ५६० हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड अपेक्षित आहे. कापसाचा वाढलेला भाव पाहता या क्षेत्रात थोडीफार वाढ होऊ शकते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kharif Season Preparation
Kharif Season Preparation: यंदा तृणधान्यासह मका, सोयाबीनचा पीक पॅटर्न! पावसावर ठरणार पिकांचे क्षेत्र

"हवामान खात्याच्या अंदाजानुसार कसमादे परिसरात पाऊस लांबलेला आहे. शेतकऱ्यांनी लष्करी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस लागवडीसाठी घाई करु नये. १५ जून नंतर पावसाचा अंदाज आहे. सरासरी सुमारे ४५ ते ५० मिलिमीटर पाऊस झाल्याने खरीप पिकाची पेरणी करावी. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळेल. कृषी विभागाने बी-बियाणे व खत साठ्याचा आढावा घेतला आहे. मुबलक बियाणे व खते उपलब्ध आहेत."

- गोकुळ अहिरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव

पिकाचे नाव - मालेगाव- बागलाण- नांदगाव

(तालुकानिहाय संभाव्य लागवडीचे क्षेत्र)

भात - ०० - २ ७००- ००

ज्वारी - २५० - २०० - १३०

बाजरी - २४०६०- १४२००- १८५००

मका - ३४९४०- ४२६५० - ३००००

इतर तृण धान्य

नागली - ५३८ - ५६०- २०

वरई - ०० - २०० - ००

-----------------------------

एकूण तृणधान्य - ५९७८८- ६०५१० - ४८५१०

--------------------------

तूर - १,७८९ - ११०० - ९८०

मुग - १४०० - १०३० - ४०००

उडीद - ३०० - ३०० - १५०

कुळीद - ३०१- ०० - २००

इतर कडधान्य - ००- १०० - ००

-----------------------------

एकूण कडधान्य - ३७८९ - २५३०- ५३३०

भुईमुग - १३४० - ११०५ - २३००

सोयाबीन - ३०० - ३५०० - १०००

-----------------------------

एकूण तेलबिया - १६४०- ४६०५- ३३००

-----------------------------

कापूस - २०५३० - १००- ६९३

Kharif Season Preparation
Nashik News: निफाडला शासन आपल्या दारी मोहीम! विविध शासकीय योजनांच्या लाभार्थींना दाखल्यांचे वाटप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com