'तो हा नव्हे'...अन् अपहरणकर्त्यांना झाला पस्तावा | Nashik

Kidnapping
Kidnappingesakal

सिडको (नाशिक) : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरल्याची घटना घडत नाही तोच दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या वेळी सिडकोच्या केवल पार्क परिसरात घरातून क्लासला निघालेल्या एका अठरा वर्षाच्या मुलास भर रस्त्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अपहरण (Kidnapping) करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नाकावर गुंगीच्या औषधाचा स्प्रे मारून सुरुवातीला अपहरण करून नंतर 'तो हा नव्हें' म्हणत सोडून दिल्याची घटना घडल्याने पालक वर्गात व नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.

अशी घडली घटना

मंगळवारी (ता. 21) सायंकाळच्या वेळी केवल पार्कच्या रस्त्यावरून डीजीपीनगरकडे क्लासला जाणाऱ्या एका अठरा वर्षाच्या मुलास रस्त्यात अडवून त्यास पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दूसर्‍या एकाने नाकावर स्प्रे मारत किडनॅप केले. नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात आल्यानंतर त्याच्या तोंडावर पाणी मारून उठविले असता नंतर एकाने तेथे येऊन तुम्ही ज्यास पकडून आणले आहे. तो हा नव्हे म्हणून सोडून देण्यास सांगितले. त्या मुलास किडनॅप करून आणणाऱ्यांना त्याचा पस्तावा झाला. त्यांनी त्या मुलाच्या हातात पैसे देऊन सोडून दिले. त्यानंतर मुलगा काही पावले पुढे आल्यानंतर चोरट्यांनी स्वीच ऑफ केलेला मोबाईल सुरू करत मुलाने आपल्या घरच्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यावर घरच्यांनी नाशिक रोड परिसरातील आपल्या नातेवाईकांना हा घटना क्रम सांगत मुलाच्या मदतीसाठी पाठवले. त्यांनी सदर मुलास पालकांकडे आणून सोडले.

Kidnapping
लसीकरणानंतर कोरोना झाल्यास तयार होते 'सुपर इम्युनिटी'

या प्रकरणात आपल्या नव्हे तर इतर दुसऱ्या कुणाला तरी किडनॅपिंग करण्याचा त्या लोकांचे बेत होता. हे लक्षात घेऊन त्यांनी सरळ अंबड पोलिस ठाणे गाठले. यावेळी सिडको परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील पोलिसांना या घटनेचा छडा लावण्याची विनंती केली. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीस चौकशी करत होते.

Kidnapping
कोकाटे बंधूंच्या लढाईत आमदार कोकाटे जिंकले!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com