
Nashik Crime News : उपनगरला महिला अन् मुलीवर चाकू हल्ला; हल्लेखोराने स्वत: ला देखील केले जखमी
नाशिक रोड : उपनगर पोलीस ठाण्याच्या जवळ असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या गेट समोर सरजीत झांजोटे उर्फ दिंगिया याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने दोन महिलांवर चाकूने सपासप वार करून घटनास्थळावरून पळ काढला व स्वतःवर देखील चाकूने वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
प्राप्त माहितीच्या आधारे अनैतिक संबंधातून हा प्रकार घडलेला आहे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या हल्ल्यामध्ये महिला ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना नाशिक रोड मधील जयराम हॉस्पिटल येथे उपचार अर्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्या पूर्व पतीची मुलगी वय 16 हिला देखील हल्लेखोराने चाकूचे वार करत जखमी केले. तिच्यावर नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात उपचार सुरू असून हल्लेखोर हा देखील गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
हल्लेखोर आणि जखमी महिला हे दोघे लिविंग रिलेशनशिप मध्ये राहत होते. दरम्यान त्यांच्यात कुठल्यातरी कारणावरून सतत भांडण सुरू होती ज्याचे पर्यावसण आज जीवघेण्या हल्ल्यामध्ये झाले.