Nashik Crime : मालेगावात मफेड्रिनसह कुत्ता गोळी जप्त

kutta goli News
kutta goli Newsesakal

Nashik Crime : शहरात कुत्ता गोळी (अल्प्राझोलम) या गुंगीच्या गोळी पाठोपाठ नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या मफेड्रिन या पावडरचा शिरकाव झाला आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक तेगबीरसिंह संधू यांच्या विशेष पोलिस पथकाने दरेगाव शिवारातील शाही गोल्डन हॉटेलजवळ टाकलेल्या छाप्यात ७७ कुत्ता गोळ्या व ८.६५ ग्रॅम वजनाची मफेड्रिन असा २२ हजार रुपयांचा ऐवज एकाकडून जप्त करण्यात आला.

यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक जण पसार झाला. गुरुवारी (ता.२५) रात्री ही कारवाई करण्यात आली. (Kutta Goli with Mephedrine seized in Malegaon Nashik Crime)

श्री. संधू यांना जुनैद डोंग्या व त्याचा मित्र एम. डी. पावडर व कुत्ता गोळी विक्री करत असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा होताच त्यांनी पथकासह शाही गोल्डन हॉटेलजवळ छापा टाकला. त्यावेळी जुनेद मोहंमद चाऊस ऊर्फ जुनैद डोंग्या (रा. निहाल नगर) याला ताब्यात घेतले.

त्याच्या सोबत असलेला आफताब कुरेशी उर्फ राजा चोर हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. जुनैदची झडती घेतली असता त्याच्याकडे अल्प्राझोलम टॅबलेटच्या ७० गोळ्या व पावणेनऊ ग्रॅम एम. डी. पावडर मिळून आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

kutta goli News
Nashik Crime : सिडकोत गावगुंडांकडुन गाड्यांची तोडफोड; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

दोघा जणांविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ अधिनियमाद्वारे (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एम. डी. पावडर जप्तीची ही तिसरी कारवाई आहे.

पोलिस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, दिनेश शेरावते, पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, हवालदार सचिन धारणकर, राकेश उबाळे, शिंदे, पोलिस नाईक सांगळे, चव्हाण, खैरनार आदींनी ही कारवाई केली.

kutta goli News
Mumbai Crime : दारूच्या नशेत मित्राचा खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com